खळबळजनक...सार्वजनिक बांधकामविभागातील कार्यकारी अभियंता अॅन्टीकरप्शनच्या जाळयात;लाच रक्कमेव्यतिरिक्त 6लाख 40 हजार जप्त.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 7, 2023

खळबळजनक...सार्वजनिक बांधकामविभागातील कार्यकारी अभियंता अॅन्टीकरप्शनच्या जाळयात;लाच रक्कमेव्यतिरिक्त 6लाख 40 हजार जप्त..

खळबळजनक...सार्वजनिक बांधकाम
विभागातील कार्यकारी अभियंता अॅन्टी
करप्शनच्या जाळयात;लाच रक्कमेव्यतिरिक्त 6 लाख 40 हजार जप्त..

वर्धा :- बिलातील 50 लाखाच्या बिलासाठी 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून लाचेची रक्कम शासकीय निवासस्थानी घेताना अँटी
करप्शनच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम
विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास अटक
केली आहे .त्यांच्याविरूध्द वर्धा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायणदास बुब (57, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा.रा. पारिजात, कार्यकारी अभियंता यांचे शासकीय निवासस्थान, वर्धा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या संस्थेचे शासकीय करारानुसार वृक्ष लागवडीचे अगोदर तिन टप्प्याचे बील मिळाले होते. चौथ्या टप्प्यातील 50 लाखाच्या बिलासाठी कार्यकारी अभियंता प्रकाश बुब यांनी तक्रारदारास त्रास दिला. त्यांच्याकडे बिलाच्या पाच टक्के म्हणजेच 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली.
प्रकाश लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अँटी करप्शन विभागाकडे तक्रार केली.दरम्यान, गुरूवारी कार्यकारी अभियंता प्रकाश बुब यांनी शासकीय निवासस्थानी तक्रारदार यांच्याकडून सरकारी पंचासमक्ष 1 लाख रूपयाची लाच घेतली. त्यावेळी अँटी
करप्शनच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
घटनास्थळी लाच रक्कमेव्यतिरिक्त 6 लाख 40
हजार रूपये मिळाले. ती रक्कम अँटी
करप्शनच्या पथकाने व्हिडिओग्राफी करून
जप्त केली आहे. प्रकाश बुब यांच्याविरूध्द
वर्धा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.ही कारवाई नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर,
अप्पर अधीक्षक मधुकर गितेनागपूर परिक्षेत्राचे
पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक
डी. सी. खंडेराव,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रविंद्र बावणेर,पोलिस हवालदार संतोष बावणकुळे, प्रशांत वैद्य,पोलिस अंमलदार प्रदीप कुचनकर,प्रितमइंगळे, प्रशांत मानमोडे यांच्या पथकाने केली आहे.

No comments:

Post a Comment