शरद पवारांची मोठी घोषणा; म्हणाले कुठतरी थांबायचा विचार केला पाहिजे असे म्हणत,'मी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडणार' - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 2, 2023

शरद पवारांची मोठी घोषणा; म्हणाले कुठतरी थांबायचा विचार केला पाहिजे असे म्हणत,'मी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडणार'

शरद पवारांची मोठी घोषणा; म्हणाले कुठ
तरी थांबायचा विचार केला पाहिजे असे म्हणत,'मी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडणार'                                                                                    मुंबई : - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. 'लोक माझे सांगाती' पुस्तकाच्या प्रशाशन सोहळयात
बोलताना त्यांनी ही घोषणा केलेली आहे. कुठं
तरी थांबायचा विचार केला पाहिजे, जास्त मोह
कारणे योग्य नाही, मी तशी भुमिका घेणार नाही असे सांगत शरद पवार यांनी पक्षाच्या
अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्या बाबतची
घोषणा केली आहे. शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती पुस्तकाच्या सुधारित भागाचे आज प्रकाशन करण्यात आले आहे. शरद पवार आता
कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत.
दरम्यान, यापुढचे तीनच वर्षे राजकारणात
राहणार असल्याचेही शरद पवार यांनी यावेळी
स्पष्ट केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येणार असून ही समिती अध्यक्षाबाबत निर्णय घेईल असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.
आता मात्र पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण
असणार याबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच
चर्चा रंगली आहे.

No comments:

Post a Comment