माजी नगरसेवकावर लग्नाच्या बहाण्याने लैंगिक छळ करून तिला गर्भपात करायला लावल्याचा महिलेने केला आरोप.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 2, 2023

माजी नगरसेवकावर लग्नाच्या बहाण्याने लैंगिक छळ करून तिला गर्भपात करायला लावल्याचा महिलेने केला आरोप..

माजी नगरसेवकावर लग्नाच्या बहाण्याने लैंगिक छळ करून तिला गर्भपात करायला लावल्याचा महिलेने केला आरोप..

मुंबई :-  माजी नगरसेवक आणि राजकीय पक्षाच्या नेत्याविरुद्ध एका 29 वर्षीय महिलेने
वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसात लैंगिक छळ केल्याचा आरोप करत पोलीस तक्रार दाखल केली आहे.महिलेने आरोप केलेला व्यक्ती हा मुंबई महापालिकेचा माजी नगरसेवक असून एका राजकीय पक्षाचा सदस्य आहे.आरोपीने लग्नाच्या बहाण्याने लैंगिक छळ करून तिला गर्भपात करायला लावल्याचा आरोप महिलेने केला
आहे. पुढे या गोष्टीची वाच्यता करू नये या साठी त्याने महिलेला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागतील असे धमकावल्याचा आरोप केला आहे. महिलेच्या आरोप नुसार तिने तीन वर्षांपूर्वी राजकीय पक्षात सदस्य म्हणून रुजू झाल्याचे सांगितले. तेव्हापासून आरोपी तिच्यावर वाईट मनशा ठेवून असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी वडाळा पोलिसांनी हा तपास अंटोप हील पोलिसांकडे हस्तांतरित केला आहे. या प्रकरणी अँटोप हील पोलीस अधिक तपास करत आहे.

No comments:

Post a Comment