अश्लील चित्रफीत पाठवित डॉक्टर महिलेला लुबाडले..
पुणे:- खासगी रुग्णालयातील डॉक्टर महिलेला धमकावून सायबर चोरट्यांनी २१ हजार रुपये लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत डॉक्टर महिलेने सायबर पोलीस
ठाण्यात फिर्याद दिली आहे.तक्रारदार डॉक्टर महिला पुणे-सातारा रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात आहे. रुग्णालयातील शिशू
अतिदक्षता विभागात त्या नियुक्तीस आहेत. अतिदक्षता विभागात त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एका तरुणीने संपर्क साधला. तरुणीने समाजमाध्यमातील सुविधेचा वापर करुन डॉक्टर महिलेला अश्लील चित्रफीत पाठविली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी स्क्रिनशॉट काढून डॉक्टर महिलेला पाठविले.चोरट्यांनी महिलेला धमकावण्यास सुरुवात केली.स्क्रिनशॉट समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी चोरट्यांनी दिली आणि त्वरित ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठविण्यास सांगितले. घाबरलेल्या डॉक्टर महिलेने ऑनलाइन पद्धतीने २१ हजार रुपये जमा केले.त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक सावंत तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment