धक्कादायक...डोक्याच्या खोल जखमेला टाक्यांऐवजी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी लावलं फेविक्विक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, May 7, 2023

धक्कादायक...डोक्याच्या खोल जखमेला टाक्यांऐवजी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी लावलं फेविक्विक..

धक्कादायक...डोक्याच्या खोल जखमेला टाक्यांऐवजी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी लावलं फेविक्विक..                            
हैदराबाद:-एकाखासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निष्काळजीपणाचं प्रकरण समोर आलंय, एक अतिशय अजब आणि हैराणकरणारं प्रकरणात तेलंगणातील जोगुलंबा गडवाल जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या प्रकरणाचा पोलिसांनी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे या
घटनेचा तपास केला असता हैराण करणारी बाब समोर आली. एका खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी उपचारात घोर निष्काळजीपणा केल्याचं आढळून आलं. जखमी मुलाला टाके लावण्याऐवजी फेविक्विकने उपचार करण्यात आले. ही बाब उघडकीस येताच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जोगुलंबा गडवाल
जिल्ह्यातील आयजा येथील खासगी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी टाक्यांऐवजी फेविक्विक लावून जखमी मुलावर उपचार केले. मुलगा पडल्याने जखमी झाला होता. कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील
लिंगसोगुर येथील रहिवासी असलेले वंशकृष्ण हे पत्नी सुनीता आणि मुलगा प्रवीण यांच्यासोबत तेलंगणामध्ये राहणाऱ्या नातेवाईकांच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आले होते.
कार्यक्रमादरम्यान खेळत असताना प्रवीण खाली
पडला.डाव्या डोळ्याच्या वरच्या भागाला दुखापत झाल्याने त्याला स्थानिक खासगी रुग्णालयात नेण्यात आलं.त्याची जखम खोलवर होती. जखमेवर टाके टाकण्याऐवजी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी फेविक्विक लावलं. हा प्रकार त्याच्या वडिलांना कळताच त्यांनी रुग्णालय
प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर आरोपी वैद्यकीयकर्मचाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. याबाबत वंशकृष्ण यांनी आयजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शुक्रवारी हे प्रकरण चर्चेत आलं. या घटनेचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेने पीडित मुलाच्या कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे. ते म्हणतात, की हे मुलासाठी धोक्याचं असू शकतं.

No comments:

Post a Comment