*अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पोलीसाचे कार्य महत्वपुर्ण: आनंद भोईटे*
बारामती:- अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये गुन्हेगारीचे स्वरूप बदललेले आहे त्यामुळे पोलिसांची तपास यंत्रणा बदललेली आहे त्यामुळे पोलिसांचे कार्य वाढलेले असून अति म्हतपूर्ण झाल्याचे पुणे ग्रामीण चे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी प्रतिपादन केले .
जय हो करिअर अकॅडमी बारामती यांच्या वतीने महाराष्ट्र पोलीस भरती 2023 मध्ये निवड झालेल्या 25 विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा भोईटे व इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी भोईटे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर व कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती पै श्याम कानगुडे ,माजी विक्रीकर अधिकारी प्रशांत सातव व जय हो करिअर अकॅडमी चे संचालक संदीप जाधव आणि इतर मान्यवर, पालक,विद्यार्थी उपस्तीत होते. यांच्या हस्ते करण्यात आले.
पोलीस क्षेत्रात काम करताना प्रसिद्धी पासून दूर राहून,प्रलोभणाला बळी न पडता जनतेची सेवा करा असाही सल्ला आनंद भोईटे यांनी दिला.
सज्जनांचे रक्षण व दुर्जनाचा बिमोड करताना खाकी वर्दीचा कायमस्वरूपी मान व सन्मान बाळगन्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी केले.
सर्व सामान्य तरुणांचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करीत असताना शारीरिक,मैदानी व बौद्धिक कष्ट करून घेण्यासाठी व कुशल पोलीस बनवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे जय हो करिअर अकॅडमी चे संचालक संदीप जाधव यांनी सांगितले.
अश्विनी देवकर,वैष्णवी खंडाळे, प्रांजली सुपेकर,माधुरी बोडरे,ज्योती जाधव,गौरी जगताप,आरती बनसुडे,निकिता पाटोळे,आकांक्षा बांडे,नीलम पोटे,अक्षदा गरुड,हर्षदा राऊत, साक्षी जगताप,रुपाली सावंत,हर्षदा कदम,संदीप रासकर,कामलेश भोसले,अक्षय चौधर,धनंजय बोराटे,मयूर कदम,विशाल चौधरी या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन अनिल रुपणवर यांनी केले.
No comments:
Post a Comment