*बारामतीत मटका पुन्हा काढतय डोकं वर* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 2, 2023

*बारामतीत मटका पुन्हा काढतय डोकं वर*

*बारामतीत मटका पुन्हा काढतय डोकं वर*                                                                      बारामती:-बारामती व बारामती तालुक्यातील अनेक गावात मटका हा सुरू असून कोणी ऑनलाईन तर कुणी कागदी चिठ्ठी वर मटका घेत असून चौका चौकात मटका चालू असून अनेक तरुण व प्रौढ या मटक्याच्या नादाला लागून बरबाद होत असल्याने व पैश्याची चणचण भासत असल्याने छोटे मोठे गुन्हे करण्यासाठी पुढे येत असून यामधून गुन्हेगारी वाढत आहे, याला वेळीच आळा घालून कारवाई व्हावी अशी मागणी अनेक वेळा होऊनही तात्पुरती कारवाई केली जाते मात्र पुन्हा हे धंदे डोकं वर काढत असल्याचे दिसत आहे, उदाहरण घ्यायचे झाल्यास बारामती शहरातील भिगवण चौक, शिवाजी चौक(गुणवडी रोड),मेडद,दुर्गा टॉकीज रोड, एम.आय.डी.सी,आमराई,इंदापूर रोड,नेवसे रोड अश्या अनेक ठिकाणी मटका चालू असून त्याची यादी लवकरच प्रसिद्ध होईलच पण अश्या ठिकाणी पोलीस कारवाई करूनही पुन्हा का मटका चालू असतो व तो कोणाच्या आशिर्वादाने याचीच चर्चा बारामतीत होताना दिसत आहे, ऑनलाईन फोन व्दारे, चिठ्ठी वर हा मटका घेतला जात असून त्याचे एजंट हे सर्वत्र फिरत असताना दिसतात.तरी असे मटका चालक मालक यांच्यावर गुन्हे दाखल होऊनही हा मटका काही बंद होऊ शकत नाही हे सत्य आहे..... *पुढील लेखात.. बारामती व बारामती तालुक्यात अवैध दारू कोण पोहच करतोय*

No comments:

Post a Comment