क्रुरतेचा कळस..हीटरने गुप्तांगाला चटके देत, भाजलेल्या अवस्थेत पतीने बलात्कार करत..पत्नीच्या तोंडावर केली लघवी..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 3, 2023

क्रुरतेचा कळस..हीटरने गुप्तांगाला चटके देत, भाजलेल्या अवस्थेत पतीने बलात्कार करत..पत्नीच्या तोंडावर केली लघवी..!

क्रुरतेचा कळस..हीटरने गुप्तांगाला चटके देत, भाजलेल्या अवस्थेत पतीने  बलात्कार करत..पत्नीच्या तोंडावर केली लघवी..!

 पुणे :-क्रुरतेने आपल्या पत्नीवर अत्याचार करणारा नराधम अटक झाला असून याबाबत मिळालेली माहिती अशी की,पत्नीचे हात
पाय बांधून तिच्या गुप्तांगाला त्याने हीटरने चटके दिले. भाजलेल्या अवस्थेत तिच्यावर बलात्कार  केला.तिच्या **** जागेत तेलाची बाटली घालून
अतिशय क्रुरपणे छळ करुन तिच्या तोंडावर
लघवी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर
आला आहे.याप्रकरणी कोंढव्यातील एका ४० वर्षाच्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ३० एप्रिल रोजी दुपारी १ ते रात्री बारा वाजेच्या दरम्यान घडली.क्रुरतेचा कळस गाठलेल्या या प्रकाराने पोलीसही स्तब्ध झाले. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार करण्यात येत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी यांना ४ मुले आहेत. फिर्यादीच्या
हातात मुलीचा मोबाईल पाहून त्यांच्या पतीला
संशय आला. फिर्यादी या कोणाबरोबर बोलत
तर नाही ना म्हणून तो त्यांना हाताला धरुन
बेडरुममध्ये घेऊन गेला. मुले ओरडत असताना
फिर्यादीला नग्न करुन त्यांचे हातपाय बांधले.
हीटर गरम करुन त्यांच्या लघवीच्या व
शौचाच्या जागेवर चटके दिले  दोन्ही ठिकाणी
भाजलेले असताना क्रुररीतीने त्यांच्याशी
शारीरीक संबंध केले. त्यानंतर तेलाची बाटली त्यांच्या *** जागेत घातली. त्यांच्या तोंडावर लघवी केली. तुला खूप माज आला आहे.
तुझा माज उतरवितो, म्हणून शिवीगाळ करुन
फिर्यादी यांच्या डोक्यात, हाता पायावर
खलबत्याने मारहाण केली.त्यांचा आरडा ओरडा ऐकून बाहेरुन मुलेही अधिक आरडा ओरडा करु लागली. तेव्हा त्याने दरवाजा उघडला.फिर्यादीची १६ व ११ वर्षाची मुलगी त्यांच्याकडे आल्या असताना ही मुले देखील माझी आहेत की नाही असे म्हणून मुलीबरोबर देखील अत्याचार करुन काय हालत करतो, असे म्हणाला. या घटनेनंतर जखमी अवस्थेत फिर्यादी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कोंढवा पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

No comments:

Post a Comment