पीडित महिलेच्या मजबुरीचा फायदा घेत कामाला लावतो म्हणून फसवुन बलात्कार केल्याचा गुन्हा बारामतीत दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 21, 2023

पीडित महिलेच्या मजबुरीचा फायदा घेत कामाला लावतो म्हणून फसवुन बलात्कार केल्याचा गुन्हा बारामतीत दाखल..

पीडित महिलेच्या मजबुरीचा फायदा घेत कामाला लावतो म्हणून फसवुन बलात्कार केल्याचा गुन्हा बारामतीत दाखल..                                                 बारामती:-अनेक ठिकाणी महिला व मुलींवर अत्याचार झाल्याचे दिसत आहे काही खऱ्या असतात तर काही खोटया असतात तर अनेक महिला व मुली मिसिंग असल्याचे देखील चिंतेची बाब झाली आहे, याबाबत तपास चालू आहे लोकेशन मिळत नाही असे सांगितले जाते, कदाचित तसे असेलही तसेच बलात्कार झालेंच्या तक्रारी अर्ज येत असतील तर काहींनी तक्रारी केल्या असतील नुकतीच बातमी देखील प्रसिद्ध झाली होती, अशीच घटना दिनांक 01/06/2023 रोजी वय 38 वर्ष पीडित महिलेने बारामती शहर पोलीस स्टेशन येथे हजर राहुन तक्रार केली होती त्याचा जबाब दिला होता की माझा मुलगा व मुलगी असे राहणेस असुन माझा विवाह 2004 साली झाला होता. परंतु आमच्यात घरगुती कारणामुळे आमचे कोर्टात डिओर्सची केस चालु आहे.
त्यांचे व माझे गेली अडीच वर्षापासून कोणताही संवाद नाही आम्ही वेगळे राहत आहे.सन् 2022 रोजी मला पैशाची गरज असल्याकारणामुळे माझे ओळखीचे एक व्यक्ती रा.  बारामती यांचेकडे मी विचारना केली की मला कोणी पैसे देईल का त्यामुळे त्यांनी मला अभिजीत शहा रा.पानगल्ली बारामती यांची ओळख करुन दिली व अभिजीत शहा यांने मला मार्च 2022 रोजी 16,000/-रु.रोख पैसे
दिले. त्यावेळी अभिजीत शहा हा मला म्हटला की तुम्ही जॉब करणार का मी तुम्हाला *** बॅक पुणे येथे कामाला लावतो असे म्हणाला मला पण नोकरीची गरज असल्यामुळे मी त्यांला नोकरी लावा असे म्हटल्याने तो मला मार्च 2022 मध्ये पुण्याला घेउन गेला परंतु त्यांने मला गाडीतच बसवुन ठेउन मला परत बारामतीला घेउन आला.त्यानंतर 10 मार्च 2022 रोजी त्यांने मला हॉटेल लिलाज बारामती येथे बोलावुन तु मला आवडतेस मला तुझे.बरोबर लग्न करायचे आहे. मी तुला व तुझे दोन्ही मुलांना सांभाळ करील तुला नोकरीस लावीन असे म्हणाला मला पण नोकरीची व आधाराची गरज असल्याने मी त्यावेळेस त्याला होकार दिला. त्यानंतर अभिजीत शहा याने 22 मार्च
2022 रोजी कॅप्टन लाज येथे नेउन मी तुझे बरोबर लग्न करणार आहे असे म्हणुन माझी संमती नसताना माझे
इच्छेविरुदध शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर त्याने वेळोवेळी नोकरीचे व लग्नाचे आमिष दाखवुन बारामतीतील
महाराजा लॉजवर व माझे राहते घरी येउन माझे इच्छेविरुध शारिरीक संबंध ठेवले.
मी अभिजीत शहा याचे कडे लग्न करण्याची सतत मागणी करीत असल्यामुळे त्यांने मला खोटे बोलुन दि.5/7/2022 रोजी कामानिमित्त पुण्याला जायचं आहे असे सांगुन त्यांचे चार चाकी गाडी टाटा जेस्ट यात देवाची आळंदी येथे घेउन गेला व लॉज वरती नेउन माझे इच्छेविरुदध शारिरीक संबंध ठेवले व दि. 06/07/2022 रोजी आराध्या मंगल कार्यालय आळंदी देवाची येथे अभिजीत शहा याने माझेबरोबर लग्न केले.
त्यानंतर मला काही दिवसांनी कळाले की, अभिजीत शहा यांचे पहिले लग्न झालेले आहे मी विचारण केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळेस आमच्या दोघांत भांडणे झाली होती त्यानंतर अभिजीत शहा ह्याने माझा विश्वास संपादित करुन माझेकडील 1) गंठण अडीच तोळे वजनाचा 2) 1 बांगडी दीड़ तोळे वजनाची 3)कानातले 5 ग्रॅम वजनाचे असे सोन्याचे दागिने मध्ये आणखीन सोन्याची भर टाकुन देतो असे म्हणुन दागिने व अॅक्टीव्हा गाडी ही सर्व्हिसिंग करुन आणतो असे सांगुन गाडी व दागिने घेवुन गेला आहे ते त्याने अदयापर्यंत सोने व अॅक्टीव्हा गाड़ी मला दिली नाही तरी दि. 22 मार्च 2022 ते 21/5/2023 दरम्यान अभिजीत शहा याने मला नोकरीचे, लग्नाचे व मुलांचा सांभाळ करतो याचे आमिष दाखवुन माझे इच्छेविरुदध बारामती शहरातील वेगवेगळ्या लॉजवर व राहते घरी येवुन वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवुन माझा विश्वास संपादित करुन माझे दागिने व अॅक्टीव्हा बाईक गाडी घेवुन माझा विश्वासघात केला आहे. म्हणुन माझी अभिजीत आनंदकुमार शहा रा. पानगल्ली बारामती ता.बारामती जि.पुणे याचे विरोधात कायदेशीर फिर्याद आहे.माझा संगणकावर घेतलेला फिर्यादी जबाब मी प्रिंट काढलेवर वाचुन पाहिला असता तो माझे सांगणेप्रमाणे बरोबर असल्याचे सांगितले आहे.त्यानुसार गुन्हा दाखल असून आरोपी कस्टडीत असल्याचे कळतंय याबाबत अनुसूचित जातीची पीडित महिला न्यायाच्या प्रतीक्षेत असुन अँक्ट्रोसिटी अंतर्गत कारवाईची देखील मागणी केली असून याबाबत न्याय मिळेल तेव्हा मिळेल पण आजची परिस्थिती अशी झाली आहे की, महिला अत्याचारात वाढ होत असताना जिथे खरे घटना घडत असताना तक्रारी दाखल करण्यासाठी किती प्रयत्न करावा लागतो तर एखादी घटना द्वेषभावना ठेवून तात्काळ दाखल होते त्याची सत्यता पडताळणी होत नाही नव्हे ती केली जात नाही हेही तेवढेच महत्वाचे असल्याचे या ठिकाणी नमूद करावंसं वाटलं,तर पीडित महिला न्यायाच्या अपेक्षेत असेल तर त्यांची कशी हेळसांड होते तसेच राजकीय    वरदहस्त असणाऱ्या मंडळींचा हस्तक्षेप वाढला असून प्रकरणे दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगण्यात येतंय याबाबत  लवकरच मांडणार  असून,येणाऱ्या काळात तरी महिलांना न्याय मिळावा कदाचित ती मजबुरीने तर कधी दबावाखाली तर कधी इज्जतीपोटी कुणी तक्रारी करतो तर कुणी करत नाही हे प्रामुख्याने मांडणार आहोत.

No comments:

Post a Comment