विद्या प्रतिष्ठानचे विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिरच्या खेळाडूंची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 27, 2023

विद्या प्रतिष्ठानचे विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिरच्या खेळाडूंची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड.

विद्या प्रतिष्ठानचे विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिरच्या खेळाडूंची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड.
बारामती:- CISCE दिल्ली बोर्ड व डॉ. मार्थियो फिलीपस स्कूल, धानोरी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२४ जून २०२३ रोजी झोनल कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये १४, १७ व १९ वर्षाखालील गटात १९० मुले व मुलींनी सहभाग घेतला होता.सदर स्पर्धेमध्ये विद्या प्रतिष्ठानचे विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर, बारामतीच्या शाळेच्या
कराटे संघांनी प्रथमच भाग घेतला होता. यामध्ये शाळेला घवघवीत यश मिळाले व सांघिक मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तसेच वैयक्तिक बक्षिसेही मिळाली.१७ वर्षाखालील मुलींच्या वयोगटात कु. आदिती शेरकर हिने सुवर्ण पदक मिळवले. १७ वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत अर्श शेख याने सुवर्ण पदक मिळवले. विनीत घोळवे व रुद्र पानसरे यांना रजत पदक प्राप्त झाले. १४ वर्षाखालील मुलांच्या वयोगटात शौर्यन राजेनिंबाळकर याला कास्य पदक प्राप्त झाले.
आदिती शेरकर व अर्श शेख यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेकरिता निवड झाली. सर्व खेळाडूंना
कराटे कोच श्री. मिनानाथ भोकरे व क्रीडा शिक्षक जितेंद्र पटेल व नितीन जगताप यांनी मार्गदर्शन केले.विद्या प्रतिष्ठान विश्वस्त मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले.शाळेचे प्राचार्य श्री. आशिष घोष व उपप्राचार्या सौ. रुपाली जाधव तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गातर्फे खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.

No comments:

Post a Comment