धक्कादायक.. बारामतीत प्रशासकिय भवनाच्या दारात शेतकऱ्याने रॉकेल ओतून घेतले पेटवून.. बारामती:-नाव मोठं लक्षण खोटं असं म्हणण्याची वेळ आली आहे बारामती चा विकासाच्या दृष्टीने अजितदादा अहोरात्र प्रयत्न करतात म्हणे मग एवढी मोठी प्रशासकीय इमारत उभी केली असतांना या कार्यालयात सर्वसामान्य लोकांची कामे होत नसल्याचे अनेक तक्रारी पुढे येत असताना नुकताच बारामती शहरातील
प्रशासकीय भवनासमोर प्रवेशद्वारातच एकाने रॉकेल ओतुन पेटवुन घेतल्याचा प्रकार सकाळी
सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडला. त्यामुळे खळबळ उडाली.रोहिदास जनार्दन माने असे या शेतकऱ्याचे नाव आहे. संबंधित
शेतकरी रेडणी (ता. इंदापुर) येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शेतजमिनीच्या वादातुन आम्हाला न्याय न मिळाल्याची त्याची
तक्रार आहे. यातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे.मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळाला नाही. घटनेनंतर प्रांताधिकारी वैभव नावडकर, पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला शहरातील सिल्व्हर जुबिली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून याबाबत अधिक चौकशी चालू आहे.
No comments:
Post a Comment