*पुष्पगुच्छ, भेटवस्तूऐवजी गरजू मुलांना आवश्यक साहित्य वाटप करावे;वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला खासदार सुप्रिया सुळे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शुभंचिंतकांना आवाहन* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, June 29, 2023

*पुष्पगुच्छ, भेटवस्तूऐवजी गरजू मुलांना आवश्यक साहित्य वाटप करावे;वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला खासदार सुप्रिया सुळे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शुभंचिंतकांना आवाहन*

*पुष्पगुच्छ, भेटवस्तूऐवजी गरजू मुलांना आवश्यक साहित्य वाटप करावे;वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला खासदार सुप्रिया सुळे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शुभंचिंतकांना आवाहन*
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच अन्य शुभचिंतकांनी आपल्या वाढदिवसानिमित्त फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू न आणता त्याऐवजी आपल्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या गरजू शाळकरी मुलांना पुस्तके, शालेय वस्तू, रेनकोट आदी भेटवस्तू आदींचे वाटप करावे, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. 

खासदार सुळे यांचा उद्या (दि. ३०) वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी सोशल मीडिया अकौंटवरून हे आवाहन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आपले कुटुंब असून या कुटुंबातील सर्वच सदस्यांना आपल्याप्रति असणारा जिव्हाळा व आस्था नेहमीच व्यक्त होत असते. उद्या वाढदिवसानिमित्तही अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व शुभचिंतक प्रत्यक्ष भेटून आपल्या शुभेच्छा देण्यासाठी उत्सुक आहेत याची आपल्याला जाणीव आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

या सर्वांनी फुले पुष्पगुच्छ आणि अन्य भेटवस्तू आणण्यापेक्षा गरजू मुलांना आवश्यक त्या साहित्याचे वाटप करावे. या सामाजिक उपक्रमाचे फोटो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करावेत, आपण स्वतः ते आपल्या सोशल मीडिया माध्यमांवर शेअर करू, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. आपला पक्ष हा नेहमीच आपली समाजाप्रतीची बांधिलकी जपत आला आहे. आपण हा गरजू मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा उपक्रमही नेहमीच्याच तत्परतेने राबवावा, हीच आपल्यासाठी वाढदिवसाचीअनमोल भेट ठरेल, असे त्यांनी नमूद केले आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02oqLiWyAfzrz8eMhCipt3Hie6fY9PX7fdkrsrWXTD92pKZVm8yUbjbDQmAcJGHQLUl&id=100044093303263&mibextid=Nif5oz

No comments:

Post a Comment