तीन हजार रुपयांसाठी गुंडाने बांधवाच्या डोळ्यात मिरची टाकून रॉडने मारहाण करत केलेल्या हत्याकांडाचा क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने निषेध नोंदवला.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, June 22, 2023

तीन हजार रुपयांसाठी गुंडाने बांधवाच्या डोळ्यात मिरची टाकून रॉडने मारहाण करत केलेल्या हत्याकांडाचा क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने निषेध नोंदवला..

तीन हजार रुपयांसाठी गुंडाने  बांधवाच्या डोळ्यात मिरची टाकून रॉडने मारहाण करत केलेल्या हत्याकांडाचा  क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने निषेध नोंदवला..
बारामती:- लातूर रेणापूर येथे अतिशय संतापजनक घटना घडली आहे.मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे. गिरीरत्न तबकाले या मातंग गरीब बांधवाने गावातील सावकाराकडून तीन हजार रुपये 10% टक्याने व्याजाने घेतले. तीन हजारांच्या बदल्यात 20 हजार रुपये वसूल केले तरीही आणखी पैसे बाकीच आहे म्हणत भर बाजारात काठीने मारहाण केली.तबकाले रेणापूर पोलीस स्टेशनला गेला नेहमी प्रमाणे दलित असलेल्या पीडिताची तक्रार घेतली नाही उलट बाँडवर जखमी पीडिताचा जबाब घेऊन प्रकरण दडपून टाकले.हाताला गंभीर मार लागल्यामुळे तो हॉस्पिटलला गेला, पोलिसांनी कार्यवाही केली नाही त्यामुळे आरोपीचे बळ वाढले.दुसऱ्या दिवशी सकाळी गिरिरत्न तबकाले याच्या घरी त्याने सकाळी 6 वाजताच हल्ला चडवला.हल्ला अतिशय क्रूरपणे केला, आरोपी अन् त्याचा भाचा या दोघांनी मिरची पावडर डोळ्यात टाकून रॉडने हल्ला केला या हल्ल्यात मातंग बांधव मृत्यूमुखी पडला.या घटनेचा क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने बारामती भिगवण चौक हिथे सदर घटनेचा निषेध नोंदवला त्यावेळी क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष अँड.सोमनाथ(भाईजी)पाटोळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विशाल भाऊ खंडाळे,पुणे जिल्हा अध्यक्ष आनंद खिलारे,तालुका अध्यक्ष आदित्य खरात,शहर अध्यक्ष रवी कुचेकर, संघटक राहुल गायकवाड,किरण शिंदे,महेश रोकडे, दौड अध्यक्ष गणेश भाऊ लोंढे,अक्षय राखपसरे, सुनिल खिलारे हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment