दिनांक 16 जुलै रोजी बारामतीमध्ये रंगणार ' स्वरभक्ती' गायनस्पर्धा...! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, July 10, 2023

दिनांक 16 जुलै रोजी बारामतीमध्ये रंगणार ' स्वरभक्ती' गायनस्पर्धा...!

दिनांक 16 जुलै रोजी बारामतीमध्ये रंगणार ' स्वरभक्ती' गायनस्पर्धा...!
बारामती :- येथील संत सावतामाळी तरुण मंडळाच्या वतीने यावर्षी संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त दिनांक 16 जुलै रोजी सर्व भक्ती या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये स्पर्धकांनी वैयक्तिक भक्तीगीत, गवळण, अभंग,भजन सादर करायचे आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी कमीत कमी चार साथीदारांसोबत आपले सादरीकरण करायचे आहे. स्पर्धेसाठी पाच वेळा जास्तीत जास्त सात मिनिटे असा वेळ दिला जाणार असून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ दोन अशी एकूण पाच बक्षीस देण्यात येणार आहे. क्रमांकाचे बक्षीस पाच हजार रुपये,द्वितीय क्रमांकाचे बक्षीस तीन हजार रुपये,तृतीय क्रमांकाचे बक्षीस एक हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 
  ' गायकांना आणि भजनी मंडळ यांना आपली कला सादर करण्यासाठी संधी मिळावी, याकरिता  यावर्षीपासून मंडळाच्या वतीने व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे, तरी या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संत सावता माळी तरुण मंडळाच्या वतीने केले आहे.
   या कार्यक्रमासाठी जुलैपर्यंत नाव नोंदणी  करणे आवश्यक आहे.
नाव नोंदणीसाठी संपर्क-
सागर जाधव-98819 74470
राजश्री आगम-9604398645
प्रदीप लोणकर-90565 65758
ह.भ. प ऋषिकेश हिवरकर महाराज-78 87 43 6545
ही स्पर्धा डेंगळे गार्डन माळेगाव रोड बारामती येथे संपन्न होणार आहे.

No comments:

Post a Comment