ओंकार(भैय्या)जाधव यांच्या कडून इर्शाळवाडी दुर्घटनेतील आपत्तीग्रस्ताना २१ हजार रुपयांचा मदत निधीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द.. बारामती:- नुकताच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस साजरा करीत असताना आवाहन करण्यात आले होते की अनावश्यक खर्च टाळा याचेच अनुकरण करीत रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दुर्घटनेमुळे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून वाढदिवसाच्या निमित्ताने हार,तुरे,बुके, फ्लेक्स यावर होणारा खर्च टाळून आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.या आवाहनाला प्रतिसाद देत बारामती मधील वसंतनगर येथील सामाजिक कार्यकर्ते ओंकार(भैय्या)जाधव यांनी २१ हजार रुपयांचा मदत निधीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुंबई येथे सुपूर्द केला.यावेळी ओंकार (भैय्या)जाधव यांच्यासमवेत सामाजिक कार्यकर्ते सयाजीराजे गायकवाड,पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड, राहुल गायकवाड, गौरव जाधव, गणेश जाधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment