निर्भया पथक स्थानिक पोलीस स्टेशन यांची वेळोवेळी मदत घेणे बाबत वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 25, 2023

निर्भया पथक स्थानिक पोलीस स्टेशन यांची वेळोवेळी मदत घेणे बाबत वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन...

निर्भया पथक स्थानिक पोलीस स्टेशन यांची वेळोवेळी मदत घेणे बाबत वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन...
बारामती:- आज रोजी मा. अप्पर पोलीस अधीक्षक बारामती श्री आनंद भोईटे यांचे मार्गदर्शनाखाली  न्यू इंग्लिश स्कूल गोजुबावी या हायस्कूल मध्ये माता पालक मेळावा या कार्यक्रमास उपस्थित राहून पाचवी ते दहावी च्या विद्यार्थिनी व माता पालकांना पोलीस स्टेशनला छोट्या मुलांच्या बाबतीत दाखल होणारे  गुन्हे चांगला वाईट स्पर्श (गुड टच बॅट टच) स्वसंरक्षण त्यामध्ये कराटे पोहणे गाडी चालवणे मुलींची होणारी छेडछाड ते थांबवण्यासाठी करावयाचे प्रयत्न पोक्सो कायद्यानुसार पोलीस स्टेशनला दाखल होणारे गुन्हे यांची उदाहरणांसहित माहिती घरातील वातावरण मुलांची शिस्त वयात येणाऱ्या मुलांची घ्यावयाची काळजी रस्त्याचे रहदारीचे नियम अलीकडच्या काळामध्ये मुलांमध्ये वाढत चालणारी व्यसनाधीनता बेशिस्तपणे वाहन चालविणे सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेमध्ये येताना जाताना एकटे एकटे न येता समूहाने यावे समूहाने जावे  कायद्याने मुलींना आणि महिलांना संरक्षण दिलेले आहे परंतु छेडछाड होत असेल तर तात्काळ बोला व्यक्त व्हा पोलिसांची मदत घ्या अन्याय सहन करू नका डायल 112 निर्भया पथक स्थानिक पोलीस स्टेशन यांची वेळोवेळी मदत घेणे बाबत अशा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment