*मुस्लिम व मागासवर्गीय समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ बारामतीत वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, July 7, 2023

*मुस्लिम व मागासवर्गीय समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ बारामतीत वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा*


*मुस्लिम व मागासवर्गीय समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ बारामतीत वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा*

बारामती :- आज रोजी बारामती येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने तसेच प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार पुणे पूर्व जिल्हाध्यक्ष राज कुमार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुस्लिम समाजातील जरीन खान याचा पोलीस कोठडीमध्ये त्यांच्या मारहानी मध्ये मृत्यू झाला या घटनेतील आरोपींवर 302 चा गुन्हा दाखल करावा तसेच अक्षय भालेराव याला न्याय मिळावा व मातंग समाजावरील होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी व अशा प्रकारच्या वारंवार होणाऱ्या मुस्लिम व मागासवर्गीय समाजावरील अत्याचाराच्या निषेधार्थ चांदशावाली दर्गा ते प्रांतअधिकारी कार्यालय बारामती पर्यंत वंचित बहुजन आघाडी  पुणे जिल्हा पूर्व च्या वतीने मुख्य शहरातून मोर्चा काढण्यात आला त्यानंतर प्रांतअधिकारी कार्यालय येथे निषेध सभा पार पडली या निषेध सभेमध्ये जिल्हाध्यक्ष राज कुमार यांनी मुस्लिम व मागासवर्गीय समाजावर वारंवार होणारे अत्याचारा विरोधामध्ये शासनाला धारेवरती धरून हे अन्याय अत्याचार जर थांबले नाहीत तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला तसेच पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांनी मुस्लिम व मागासवर्गीय समाजावरती होणारे अन्याय अत्याचाराचा तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त केला व राष्ट्रवादी व बीजेपीच्या पाठीमागे न जाता मुस्लिम समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभे रहावे अशे आव्हान केले तसेच बारामती तालुकाध्यक्ष रामदास जगताप, शहराध्यक्ष ऍड.रियाज खान, प्रशांत कांबळे, यांनी महाराष्ट्र होणाऱ्या या घटनांचा निषेध केला, तसेच महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानचे बारामती शहराध्यक्ष अजीज सय्यद यांनी मुस्लिम समाजावरती होणाऱ्या अन्याय बाबत जाहीर निषेध व्यक्त करून वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चास जाहीर पाठिंबा दिला यावेळी संपर्कप्रमुख ऍड. वैभव कांबळे, विनय दामोदरे, अशोक कुचेकर, आनंद जाधव, माळेगाव शहराध्यक्ष अण्णा घोडके, उपाध्यक्ष रमेश शिंदे, मोहन कांबळे, जिल्हा संघटक सुजय रणदिवे, सिद्धांत सावंत, अखिल बागवान, तोसिफ शेख, इंदापूर तालुका अध्यक्ष मनोज साबळे, महासचिव गौतम कांबळे, प्रसिद्धी प्रमुख राहुल कांबळे, शहराध्यक्ष सुभाष खरे, संतोष कांबळे, आदेश निकाळजे, तालुका सचिव प्रतीक चव्हाण, महासचिव सुरज कांबळे, सामाजिक कार्यकर्ते सचिन जगताप, मंगेश सोनवणे,काकासाहेब सोनवणे, संघटक गणेश थोरात, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment