“ एक सही संतापाची ” मोहीम संपूर्ण राज्यात; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बारामतीत शुभारंभ. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, July 8, 2023

“ एक सही संतापाची ” मोहीम संपूर्ण राज्यात; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बारामतीत शुभारंभ.


“ एक सही संतापाची ” मोहीम संपूर्ण राज्यात; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बारामतीत शुभारंभ..
बारामती:-महाराष्ट्रात होत असलेल्या गलिच्छ राजकारणात मतदार राजाचा अपमान होत आहे. या राजकीय घडामोडींवर आयोजित  “ एक सही संतापाची ” मोहीम संपूर्ण राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राबवण्यात येत आहे. 
याचा बारामतीतील शुभारंभ आज प्रदेश उपाध्यक्ष ॲड.सुधीर पाटसकर, जिल्हा उपाध्यक्ष ॲड.पोपटराव सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष ॲड.निलेश वाबळे, प्रवीण धनराळे, ॲड.सोमनाथ पाटोळे, ॲड. मेघराज नालंदे ,अजय खरात, ओम पडकर आदींच्या उपस्थित करण्यात आला.

महाराष्ट्रातील या चार पक्षांनी मतदार राजाचा अपमान केला आहे व त्यांनी दिलेल्या मताची खिल्ली उडवली आहे त्यामुळे अशा राज्यकर्त्यांना धडा व्हावा या हेतूने नागरिकांनी त्यांचा संताप व्यक्त करणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया मनसे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर पाटसकर यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment