मराठी, हिंदी प्रमाणे इंग्रजी भाषेचंही ज्ञान असणं आवश्यक ! - प्रचारिका नेत्रा सुर्वे* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, July 24, 2023

मराठी, हिंदी प्रमाणे इंग्रजी भाषेचंही ज्ञान असणं आवश्यक ! - प्रचारिका नेत्रा सुर्वे*

*मराठी, हिंदी प्रमाणे इंग्रजी भाषेचंही ज्ञान असणं आवश्यक ! - प्रचारिका नेत्रा सुर्वे*
     सातारा (प्रतिनिधी) :- हे धावतं युग असलं तरी हे स्पर्धेचं युग आहे या स्पर्धेत टीकायचं असेल तर मराठी हिंदी बरोबर इंग्रजी भाषेचंही ज्ञान असणं आवश्यक आहे असे प्रतिपादन संत निरंकारी मिशनच्या प्रचारिका नेत्रा सुर्वे (सिंधुदुर्ग) यांनी केले.
   सदरचा संत सामगम सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या आशीर्वादाने व सातारा झोनचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शना खाली येथील स्वराज्य मंगल कार्यालयात रविवारी (ता. 23) सकाळी 11 ते 2 या वेळेत आयोजित केला होता. त्याप्रसंगी मिशनच्या प्रचारिका नेत्रा सुर्वे बोलत होत्या.
    या समागमास सातारा क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक दीपक शेलार, बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने, सातारा संयोजक या प्रमुखांसह आजूबाजूंचे मुखी सेवादल अधिकारी तसेच परिसरातील दीड ते दोन हजाराचा समुदाय उपस्थित होता. 
     संत निरंकारी मिशन आध्यात्मिक विचारधारेच्या माध्यमातून विश्वात विश्वबंधुत्व व शांती प्रस्थापित करण्याचे महान कार्य गेली 94 वर्षे अविरत पणे सुरु असल्याचे सांगून सुर्वे म्हणाल्या हे आधुनिक युग आहे या युगाबरोबर चालायचे असेल तर आपलं वक्तृत्व आणि सर्व भाषेवर प्रभुत्व असणं हे महत्वाचे आहे असेही प्रचारिका सुर्वे यांनी सांगितले.
    सदरचा सामगम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सातारा झोन मधील सेवादल अधिकारी, सेवादल व सेवादल भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले. तर इंग्रजी भाषेतून उत्कृष्ट मंचसंचालन अक्षय खवळे व प्रसाद भिसे यांनी केले.

No comments:

Post a Comment