बारामती:- बारामती येथे यशवंत ब्रिगेड संघटनेची पुणे जिल्हा प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रविवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता. मल्हार क्लब, बारामती येथे आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष बापूराव सोलनकर, पुणे जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम ढोणे यांनी दिली.
यशवंत ब्रिगेड संघटना बैठकीमध्ये बहुजन समाजाच्या विविध मागण्या, तसेच सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करणे, ओबीसी समाजातील सर्व घटकांतील मिळणाऱ्या योजना संबंधी चर्चा करणे, तसेच धनगर समाजाला आदिवासी प्रमाणे जाहीर केलेल्या सवलती, याविषयांवर चर्चा तसेच यशवंत ब्रिगेड संघटनेचा संपूर्ण महाराष्ट्र भर विस्तार करण्यासाठी प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
असे यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष बापूराव सोलनकर यांनी सांगितले
No comments:
Post a Comment