बारामती:- माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मुळशी पॅटर्न मधील डायलॉग व मोक्का मधील आरोपींचे व्हिडिओ स्टेटसला ठेवणारा आरोपी किरण भीमराव लकडे वय २३ वर्षे रा.लकडे वस्ती , माळेगाव ता.बारामती यास माळेगाव पोलीस स्टेशनकडून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 151 (3) प्रमाणे कायदेशीर कारवाई केली असून या आरोपीस सहा दिवस न्यायालयीन कोठडी माननीय प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, बारामती यांनी सुनावली आहे.सदर बाबत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री इंगळे यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी पोलीस निरीक्षक किरण अवचर यांना सूचना केल्याप्रमाणे तात्काळ सूत्रे हलवून सदर आरोपीस पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे व पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर व स्टाफ यांच्या मदतीने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 151 प्रमाणे अटक करून त्याचा पूर्व इतिहास व भविष्यकाळातील सण-उत्सव याच्या पार्श्वभूमीवर त्याच्या हातून दखलपात्र स्वरूपाचा अगर खुणासारखा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता असल्याने त्यास मा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दिनांक 28 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशाप्रकारे सोशलमिडीया द्वारे दहशत पसरविणारे व्यक्ती यांचेविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. किरण अवचर यांनी सांगितले आहे.
Post Top Ad
Wednesday, August 23, 2023
Home
ताज्या घडामोडी
बारामती
मुळशी पॅटर्न मधील डायलॉग व मोक्का मधील आरोपींचे व्हिडिओ स्टेटसला ठेवणाऱ्या युवकावर कारवाई..
मुळशी पॅटर्न मधील डायलॉग व मोक्का मधील आरोपींचे व्हिडिओ स्टेटसला ठेवणाऱ्या युवकावर कारवाई..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment