बारामती तालुका व शहरातील अवैध धंदे कधी होतील बंद?अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीकडे वळण्याचा लागलाय छंद..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 23, 2023

बारामती तालुका व शहरातील अवैध धंदे कधी होतील बंद?अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीकडे वळण्याचा लागलाय छंद..!

बारामती तालुका व शहरातील अवैध धंदे कधी होतील बंद?अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीकडे वळण्याचा लागलाय छंद..!                                 बारामती:- बारामती तालुका व शहरात कधी होईल अवैध धंदे बंद अवैध दारू, जुगार, मटका,गांजा यासारखे अवैध धंदे सद्या जोरात चालू असून यामुळे गुन्हेगारी वाढत असून यामधून गुन्हे वाढत असल्याचे दिसत आहे याला आळा घातला गेला पाहिजे नव्याने पोलीस खात्यात रुजू झालेले अधिकारी यामध्ये लक्ष घालतील याबाबत शंका नाही नुकताच झारगडवाडी (सोनगाव)येथील इसमाकडे 3000/- रूपये किमतीची गावठी हातभटटीची तयार दारू एकून 30 लीटर ते  35 लीटर मापाचे काळे कॅनमध्ये तसेच होन्डा कंपणीची एक्स ब्लेन्ड मोटार सायकल 40000 किमतीची नंबर प्लेट नसलेली तिचा चॅसी नंबर एम.ई.4 के. सी.354 जी. के.ए.006625 ताब्यात घेतले, तारीख 23/08/2023 रोजी दुपारी 140:35 वा. चे.सु । बारामती इंदापूर रोडवर इसम नामे मोटार सायकल वर एका बाजुला काळे रंगाचे कॅन त्यामध्ये तयार गावठी हातभटटीची दारू 30 लिटर एकून कि. 3000 वाहतूक करून घेवून जात असताना देवकाते हॉस्पीटलचे कार्नरला बारामती मिळून आला आहे  यांचे विरुध्द महा.प्रो.का. क 65 (ई) प्रमाणे सरकार तर्फे कायदेशीर फिर्याद दाखल झाली असून पोलिसांनी ही कारवाई केली मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग करतंय काय? तर दुसरीकडे खुलेआम हॉटेल,ढाबा,घरांमधून बेकायदेशीर देशी दारू विकली जाते याकडे लक्ष कधी जाईल नुकतीच झालेल्या हातभट्टी दारूच्या कारवाईमुळे बारामती तालुक्यासह शहरात अवैध दारू विक्री होत असल्याचे सिद्ध झाल्याचे दिसत आहे, राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे की काय अशी प्रतिक्रिया महिला वर्गात होताना दिसत आहे, नीरा,जेजुरी व बारामती शहरातून गावागावात दारू सप्लाय होत असताना कारवाई करण्यास नेमकी कोणती अडचण येतंय हे वरिष्ठ अधिकारी यांनी विचारावं बारामती विकसित होत असताना अवैध धंदे वाढत असल्याने गुन्हेगारी वाढली जात असून अल्पवयीन मुले याला बळी पडत असून गंभीर घटना घडताना पाहायला मिळाले आहे, आत्ता तरी पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे लक्ष देईल व अवैध दारू विक्रते वर कारवाई करतील अशी आशा बाळगू या.

No comments:

Post a Comment