सातबारा उताऱ्यावर नोंदी साठी घेतली जाते लाच; मंडल अधिकाऱ्यासह खासगी व्यक्ती 9 हजार रुपये लाच घेताना अँन्टी करप्शनच्या जाळ्यात.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, September 7, 2023

सातबारा उताऱ्यावर नोंदी साठी घेतली जाते लाच; मंडल अधिकाऱ्यासह खासगी व्यक्ती 9 हजार रुपये लाच घेताना अँन्टी करप्शनच्या जाळ्यात..

सातबारा उताऱ्यावर नोंदी साठी घेतली जाते लाच; मंडल अधिकाऱ्यासह खासगी व्यक्ती 9 हजार रुपये लाच घेताना अँन्टी करप्शनच्या
जाळ्यात..                                                                             नाशिक :-लाचखोरीचे प्रमाणात वाढ होत असताना नायब तहसिलदार यांनी स्वस्त धान्य दुकानादाराकडून लाच घेतल्याची घटना ताजी असतानाच शासकीय योजने अंतर्गत वडिलांच्या
सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी करुन 9 हजार रुपये लाच घेताना येवला तालुक्यातील मौजे सावरगाव येथील मंडळ अधिकाऱ्यासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. नाशिक
एसीबीच्या पथकाने ही कारवाई गुरुवारी (दि. 7 )
केली. मंडळ अधिकारी पांडुरंग हांडू कोळी ( वय
- 57 ), खाजगी इसम विठोबा जयराम
शिरसाठ (वय-32 रा. मुपो ठाणगांव, तालुका येवला, जिल्हा नाशिक) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत, याबाबत एका व्यक्तीने नाशिक एसीबीकडे तक्रार केली आहे.तक्रारदार यांच्या आईचे नाव लक्ष्मी मुक्ती या शासकीय योजनेअंतर्गत वडिलांच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी पांडुरंग कोळी यांनी 15 हजार रुपये लाचेची मागणी केली.तडजोडी अंती 9 हजार रुपये देण्याचे
ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने बुधवारी (दि. 6 ) पडताळणी केली असता मंडळ अधिकारी पांडुरंग कोळी याने 15 हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती 9 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.तसेच लाचेची रक्कम खासगी इसम विठोबा शिरसाट यांच्याकडे देण्यास सांगितले.पथकाने सापळा रचून विठोबा शिरसाट याला तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले.यानंतर मंडळ अधिकारी पांडुरंग कोळी
याला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर
गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला
आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा
घारगे-वालावलकर,अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी,पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मीरा आदमाने पोलीस अंमलदार प्रवीण महाजन,किरण अहिरराव, प्रमोद चव्हाण, परशराम जाधव यांच्या पथकाने केली असून अधिक तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment