बापरे..महिला पोलिसांवर पोलिस कर्मचाराने केला गुंगीचे औषध देऊन बलात्कार,व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 5, 2023

बापरे..महिला पोलिसांवर पोलिस कर्मचाराने केला गुंगीचे औषध देऊन बलात्कार,व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी...

बापरे..महिला पोलिसांवर पोलिस कर्मचाराने केला गुंगीचे औषध देऊन बलात्कार,व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी...
 पुणे :-बलात्काराच्या घटना वाढत असताना न्याय मागणाऱ्या पोलीस खात्यातील पोलीसच महिलांवर अत्याचार करीत असल्याचे अनेक घटना उघडकीस आल्या असून याबाबत पोलीस खात्यातील चांगल्या व प्रामाणिक पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याचे दिसत आहे, नुकताच लॉकडाऊनच्या काळात ओळख
वाढवून जेवणास घरी येत असताना गुंगीचे
औषध  देऊन पोलीस शिपायाने महिला पोलीस कर्मचाऱ्यावर  बलात्कार केला. त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन
तिच्यावर सातत्याने बलात्कार  केला. पिस्तुलाचा
धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी  मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात नेमणूक असलेल्या दीपक सिताराम मोघे या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने खडक
पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं.२९४/२३) दिली आहे. हा प्रकार पोलीस वसाहत तसेच खडकवासला येथील लॉजवर २०२० ते १ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडला. याबाबत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही पुणे शहर पोलीस दलात
नेमणूकीला असून पोलीस वसाहतीत रहायला आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत आरोपी दीपक मोघे याने फिर्यादीशी ओळख वाढविली. या काळात त्यांच्या घरी जेवणास तो येत
होता. त्या दरम्यान त्याने कोल्ड्रींकमधून
फिर्यादीला गुंगीकारक औषध दिले.त्यामुळे फिर्यादीस उलट्या व त्रास होत असल्याने फिर्यादीला त्याने गोळ्या खाण्यास दिल्या. त्यामुळे आणखी गुंगी येऊन फिर्यादी यांना झोप लागली. तेव्हा त्याने फिर्यादीसोबत शारीरीक
संबंध केले.त्याची चित्रफित तयार केली. हा प्रकार समजल्यावर त्यांनी जाब विचारताच
त्याने हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीचे पतीला जीवे ठार
मारण्याची धमकी दिली.फिर्यादीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
फिर्यादीला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.फिर्यादीच्या घरातील कपाटातील ५ ते ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने,लॅपटॉप, डोंगल व मोबाईल अशा सर्व
वस्तू जबरदस्तीने घेऊन गेला.त्याच्या या त्रासाला कंटाळून शेवटी फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून सहायक पोलीस निरीक्षक तोटेवार तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment