विकसीत बारामतीत समस्या चिंचकर इस्टेट,प्रगतीनगर च्या...
बारामती:-बारामती शहराचा विकास होतोय पण अंतर्गत भागाचा विकास होत नाही कारण तो पाच वर्षांनी निवडणूक आली की मग कुठेतरी स्थानिक रहिवाशी यांचा राग शांत करण्यासाठी थोडाफार कामे करायची अश्या अनेक भागात समस्या उद्भवत असून याकडे लक्ष कधी जाईल याची नागरिक वाट पाहत आहे अशीच समस्या प्रगतीनगर ची आहे यापैकी चिंचकर इस्टेट ची तर जास्त आहे1) चिंचकर इस्टेट चौकात पॕच वर्क केले आहे त्या खडीवरून घसरून अपघात होत आहेत तरी त्या पॕच वर डांबर टाकून स्मूश फिनिशिंग करावे. तसेच काहीजण जोरात वाहने चालवतात व अपघात होतात तरी चिंचकर चौकातील रस्त्यावर चारही बाजूच्या रोड वर स्पीड ब्रेकर टाकावे..
2) चिंचकर इस्टेट चौक ते तांदुळवाडी रोड या 12 मीटर रोडला अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत..
3) तसेच तांदूळवाडी रोड वरून चिंचकर इस्टेट,प्रगती नगर कडे वळताना पुढे आले वर एका ठिकाणी धोकादायक वळण आहे यामुळे रस्ता देखील छोटा झालेला आहे.. यावर काही मार्ग निघला तर उत्तम.
4) तसेच श्री.बाळासाहेब गायकवाड यांचे घरापासून तांदूळवाडी रोड ला स्ट्रीट लाईटच बसवली नाहीये...यामुळे रोड वर राञी अंधार असतो..मुली,महिलांना जाता येता या रस्ताने असुरक्षित वाटते..
5) तसेच चिंचकर चौकात नागरिकांच्या सुरक्षीततेसाठी CCTV कॕमेरे बसवून मिळावेत..
6) T.C कॉलेज ते ब्रीज हा रस्ता पुर्ण खराब झालेला आहे.या बाबत वारंवार येथील रहिवाशी यांनी तक्रारी लेखी व तोंडी केल्या पण प्रशासनाला जाग येत नाही.
No comments:
Post a Comment