विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रशिक्षण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 18, 2023

विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रशिक्षण..

विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रशिक्षण.. 
बारामती:- मंगळवार दिनांक 17 10 2023 रोजी राष्ट्रीय सेवा योजना बारामती एमआयडीसी अग्निशमन दल व एन डी आर एफ कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते .याप्रसंगी माननीय श्री सुनील इंगवले प्रमुख व्यवस्थापक अग्निशामक दल एमआयडीसी बारामती व त्यांच्या टीमने आणीबाणीच्या वेळी अग्निशमन दल हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कसे लढते हे चित्त थरारक प्रत्यक्ष उदाहरण दाखवून स्पष्ट केले .यावेळी मा. श्री तुषार झेंडे पाटील आपदा मित्र राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेल्या 13 आपदा मित्रानी नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती दरम्यान स्वतःची व इतरांची काळजी तसेच पर्यावरण ,वित्त आणि जीवित हानी कशी हाताळावी याची संपूर्ण माहिती प्रात्यक्षिकांद्वारे दिली .या दरम्यान माननीय श्री सुनील इंगवले साहेब व श्री तुषार झेंडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती निवारण योग्य मार्गदर्शन केले. याप्रसंगी सुप्रसिद्ध बांधकाम  व्यावसायिक श्री भगवान चौधर व श्री नितीन सातव यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे सर यांनी  महाविद्यालयात ठीक ठिकाणी असणाऱ्या अग्निशमक संयंत्रांची माहिती सांगितली. या कार्यक्रमासाठी 350 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी सौ मंगल माळशिकारे - गावडे, डॉ.राहुल तोडमल व डॉ. मंगेश कोळपकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment