राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षाला मिळाले बारामतीत दोन दोन अध्यक्ष शरद पवार गटाच्या तालुकाध्यक्षपदी निवडीने दोन गट पडल्याने राजकारण तापणार..
बारामती :- राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्याचे व ते खरं आहे का हे अद्याप ही स्पष्ट नसल्याचे चर्चा बारामतीत रंगत असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाने ज्येष्ठ वकील अँड. एस.एन.जगताप यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बारामती तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली
आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी
अँड. जगताप यांना नियुक्तीचे पत्र सादर केले.
बारामती तालुक्यात शरद पवार गटाच्या
कार्यकारिणीच्या निवडीचे सत्र सुरु झाल्यामुळे
राजकीय वातावरण आता वेगळ्या दिशेने जाणार
ही बाब स्पष्ट झाली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत जात सत्तेत प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी
या भूमिकेला विरोध केला होता. त्या नंतर आता
बारामतीत शरद पवार यांच्या वतीने पक्षीय बांधणी सुरु करण्यात आली आहे.अँड. एस. एन. जगताप हे बारामती तालुक्यात ज्येष्ठ वकील व पवार कुटुंबियांचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात. आज त्यांनी अधिकृतपणे शरद
पवार यांच्या गटात सहभागी होण्याची भूमिका
घेतली आहे. बारामतीत आता राष्ट्रवादीचे दोन गट
कार्यरत राहणार हे आज स्पष्ट झाले आहे.
आता शरद पवार गटाच्या वतीने पक्षीय बांधणी
सुरु झाल्यामुळे बारामतीतही राजकीय समीकरणे
वेगळी होणार हे स्पष्ट झाले आहे,राष्ट्रवादीत खरच दोन गट पडलेले आहे का याची चर्चा अनेक स्तरावर सुरु होत्या. आजच्या अँड.एस.एन. जगताप यांच्या नियुक्तीने बारामतीत
राष्ट्रवादी मध्ये दोन गट झाल्याचे उघड झाले आहे. आगामी सर्वच निवडणूकात हे दोन गट
परस्परांसमोर उभे ठाकणार की आणखी काही
समीकरणे बदलणार या बाबतही चर्चा सुरु झाली
असून येणाऱ्या निवडणुका राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी होणार?तर भारतीय जनता पार्टी देखील सक्रिय झाली असून त्यापद्धतीने जोरदार तयारी चालू असल्याचे दिसत आहे, खऱ्या अर्थाने आत्ता खरी गंमत येणाऱ्या निवडणुकीत दिसणार आहे.
No comments:
Post a Comment