काय सांगता..रात्री आमचं गाव विकायला काढलं होतं की काय, काय माहिती?ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान कुणी केला आरोप..
बारामती:- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान
होत असताना आरोप प्रत्यारोप केला जात होता यामध्ये मतदानासाठी पैसे वाटले गेले असल्याचे आरोप झाले,बारामती तालुक्यातील काही गावात अटीतटीच्या लढाईत मतदारांचा मात्र फायदा झाला दिवाळी गोड होणार कारण एक एक अडीशे ते हजारो रुपये मताला वाटले गेले असल्याचे समजतंय,गुणवडी,काटेवाडी,मेडद,डोरलेवाडी सह अनेक भागात चुरशीची लढाई चालू होती, त्यामुळे विकास कामे कमी मताच्या पैश्यावरच जास्त लक्ष काही मतदारांचं होत, काही ठिकाणी वाद झाला तर कुठे हाणामारी झाली अशी माहिती समजतंय.तर नुकताच बारामती तालुक्यात अजित पवार यांचे गाव असलेल्या
काटेवाडी मध्ये ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, अशी लढत होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काटेवाडी अजित पवार गट विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे. राज्याच्या राजकरण्यात एकत्र असणारे दोन्ही आमने-सामने आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे,भाजपचे पॅनल प्रमुख पांडुरंग कचरे यांनी अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. ही निवडणूक गावकऱ्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आहे.गावातील भ्रष्टाचार आणि दहशत आपल्याला कमी करायची आहे. गावात काहीच व्यवस्था नाहीत. नाव मोठं
आणि लक्षण खोटं, अशी परिस्थीती गावात आहे, असे कचरे म्हणाले. रात्री आमचं गाव विकायला काढलं होतं की काय, काय माहिती? २५० रुपयाला आमचं गाव विकायला काढलं होतं. आमचं गाव विकणे आहे. एका माणसाची किंमत
२५० रुपये आहे, असे बोर्ड आम्ही उद्या गावात लावणार आहे. ही खेदाची गोष्ट आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या गावात विकास केला असेल तर पैशे वाटायची गरज का पडली?,असा प्रश्न पांडुरंग कचरे यांनी उपस्थित केला.
No comments:
Post a Comment