जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मतिमंद मुलांच्या
शाळेत दिव्यांग दिन साजरा..
फलटण:-जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महात्मा शिक्षण संस्था संचलित मतिमंद मुलांची शाळा,शिवाजीनगर फलटण ता. फलटण येथे सकाळी ११ वाजता स्नेहमेळावा आयोजित करणेत आला होता.महात्मा शिक्षण संस्था मतिमंद मुलांची शाळा अध्यक्ष संदिप चोरमले यांनी शाळेविषयी सविस्तर माहिती दिली आणि संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ठाकुरकी येथे जागा घेतल्याचे त्यांनी सांगितले. तेथे १८ वर्षाच्या वरील प्रौढ विद्यार्थ्यांसाठी नविन इमारत बांधणार असून तेथे कार्यशाळा सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शाळेला नेहमी मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तींचे आभार मानले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.ला. प्राध्यापिका सौ.निलम देशमुख यांनी मुलांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि या मुलांसाठी लायन्स गोल्डन ग्रुप फलटण च्या वतीने भरीव मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांची
दैनंदिन माहिती जाणून घेतली तज्ञ डॉ. शशिकांत
जाधव यांनी फिजिओ थेरपी विषयी पालकांना
सविस्तर माहिती सांगितली.डॉ. स्नेहल गाढवे यांनी मुलांची दंत तपासणी करून सविस्तर मार्गदर्शन करून त्याचे महत्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना समजून सांगितले,तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा प्रा. ला. सौ.
निलम देशमुख अध्यक्षा लायन्स क्लब गोल्डन ग्रुप
फलटण ह्या होत्या. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. ला. सौ. संध्या गायकवाड सचिव लायन्स गोल्डन ग्रुप फलटण यांनी शाळेचे विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. महात्मा शिक्षण संस्था संचलित मतिमंद मुलांची शाळा अध्यक्ष संदीप चोरमले आणि त्यांच्या पत्नी सचिव सौ. स्वातीताई चोरमले आपण खूप चांगले काम करत आहात असेही त्या म्हणाल्या.मा. ला. सौ उज्वला निंबाळकर चार्टर्ड अध्यक्षा लायन्स गोल्डन ग्रुप फलटण, मा ला. सुनंदा भोसले माजी अध्यक्षा लायन्स गोल्डन ग्रुप फलटण मा.ला. सौ सुनिता कदम माजी अध्यक्षा लायन्स गोल्डन ग्रुप फलटण ह्या उपस्थित होत्या. लायन्स गोल्डन ग्रुप फलटण च्या सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होत्या सरस्वती शिक्षण संस्थेच्या संकलिका सौ. प्रियंका पवार याही उपस्थित होत्या. तसेच प्रहार संघटनेचे पदाधिकारी सुभाष मुळीक, महेश जगताप, सागर गावडे हे उपस्थित होते.
त्यांनी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश लालसरे सर यांनी
केले होते. तर शाळेचे मुख्याध्यापक अमित राऊत
सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. शाळेचे
विशेष शिक्षिका सौ. गिरना पवार, सौ. सुनिता
गायकवाड, राधिका माळवे, वंदना धारशिवकर,
अमोल राऊत, पूजा कडू यांचे मोलाचे सहकार्य
लाभले. या कार्यक्रमासाठी पालक व विदयार्थी
मोठ्या संख्येने उपस्थित होते, उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते विविध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार
करण्यात आला त्याचप्रमाणे मुलांना आणि
पालकांना अल्पोआहार देणेत आला.दिव्यांग दिन अतिशय उत्साहात पार पडला.मुलांचा आनंद पाहून उपस्थित पाहुणे भारावून गेले होते. हा दिव्यांग दिन अतिशय उत्साहात पार पडला.
No comments:
Post a Comment