बापरे..बापानेच केला दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार;बापावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 12, 2024

बापरे..बापानेच केला दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार;बापावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा..!

बापरे..बापानेच केला दोन अल्पवयीन
 मुलींवर लैंगिक अत्याचार;बापावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा..!
पुणे :-मुलींवर अत्याचार होत असल्याच्या घटना ताज्या असताना चक्क  आईच्या निधनानंतर 13 वर्षीय दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार
 करणाऱ्या नराधम बापावर वानवडी पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा
धक्कादायक प्रकार ऑक्टोबर 2023 मध्ये
हडपसर परिसरातील हांडेवाडी रोड येथे घडला आहे. सी डब्ल्यू सी, पुणे यांच्याकडे आलेल्या पत्रामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत 13 वर्षीय पीडित मुलीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन नराधम बापावर आयपीसी 354(अ), पोक्सो अॅक्ट नुसार दाखल केला आहे. बाल कल्याण
समिती कडे प्राप्त झालेल्या तक्रारीवरून
पोलिसांनी पीड़ित मुलींचा जबाब नोंदवुन आरोपी बापावर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईच्या निधनानंतर फिर्यादी व तिची 13 वर्षाची बहिण वडिलांसोबत सोसायटीत राहत आहे.
पीडित मुलीची बहिण घरात पाणी भरत
असताना आरोपीने तिच्या स्त्री मनास
लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे स्पर्श
केला. वेळोवेळी दोघी बहिणी सोबत
गैरवर्तन करत होता.त्याने सांगितल्या प्रमाणे मुलींनी केले नाही तर तो त्यांच्यावर ओरडत होता.याबाबत सी डब्ल्यू सी पुणे यांना एक पत्र
मिळाले होते. या पत्रानुसार वानवडी
पोलीसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून
गुरुवारी आरोपी बापावर गुन्हा दाखल
केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

No comments:

Post a Comment