धक्कादायक..सावकारांच्या त्रासाला व्यावसायिक वैतागला;जीवन संपवतो,कुटुंबाला न्याय द्या.चिठ्ठी लिहून व्यावसायिक बेपत्ता..? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 8, 2024

धक्कादायक..सावकारांच्या त्रासाला व्यावसायिक वैतागला;जीवन संपवतो,कुटुंबाला न्याय द्या.चिठ्ठी लिहून व्यावसायिक बेपत्ता..?

धक्कादायक..सावकारांच्या त्रासाला व्यावसायिक वैतागला;जीवन संपवतो,कुटुंबाला न्याय द्या.चिठ्ठी लिहून व्यावसायिक बेपत्ता..?
बारामती:- झारगडवाडीत सावकारांचा नंगानाच 
तीन लाखाचे बारा लाख व्याज देऊन ही व्यवसायिकाला धमक्या देण्याचा प्रकार चालू असल्याचे समजते,नुकताच समजलेल्या माहितीनुसार झारगडवाडी येथील एका व्यावसायिकाला गावातल्या सावकारांनी एका व्यावसायिकाची अक्षरशः लूट केली आहे.गावातला एक दुधाचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने गावातल्या सावकारांकडून तीन व पाच टक्के व्याजाने पैसे घेतले होते. त्या पैशाची परत फेड करण्यासाठी त्यांनी मुद्दल देऊन दुप्पट तिप्पट पैसे देऊन व्याजाचा तगादा लावला आहे. अनेकांनी त्यांना शिवीगाळ धमक्या मारहाण केल्यामुळे शेवटी त्यांनी सगळ्या सावकारांची नावानी दिलेली रक्कम लिहून ठेवून माझ्या कुटुंबाला न्याय द्या मला जगायची इच्छा नाही अशा आशयाची चिट्ठी लिहिली असल्याचे कळत आहे.सकाळपासून त्यांनी सगळीकडे शोधाशोध करून ही सापडले नाहीत अशी माहिती कळतंय, त्यामुळे त्यांच्या मुलाने बारामती तालुका पोलीस स्टेशन कडे धाव घेतली आहे. आता पोलिस या प्रकरणी काय कारवाई करणार हें पहावं लागेल.

No comments:

Post a Comment