स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई; एक गावठी पीस्टल व एक जिवंत काडतुसासह आरोपीला घेतले ताब्यात.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 10, 2024

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई; एक गावठी पीस्टल व एक जिवंत काडतुसासह आरोपीला घेतले ताब्यात..

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई; एक गावठी पीस्टल व एक जिवंत काडतुसासह आरोपीला घेतले ताब्यात 
बारामती:-पाहिजे असलेला फरारी आरोपींचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करणे बाबत अंकित गोयल सो,पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिला होता.मा.वरिष्ठ पो.नि. श्री अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रा. यांचे मार्गदर्शनाखाली योग्य त्या सूचना देऊन एलसीबी चे पथक तयार करण्यात आले होते.दि.10/1/24 रोजी सदरचे पथक पाहिजे फरारी आरोपींचा शोध घेणेकामी बारामती शहरात पेट्रोलिंग करत हजर असताना.   स.पो.नी. संकपाळ यांना गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की इसम नामे रोहित उर्फ बापू निकम रा. श्रीराम नगर बारामती याच्याकडे गावठी बनावटीचा पिस्टल आहे व तो सद्ध्या श्रीराम नगर भिगवन रोडलगत कोणाचीतरी वाट बघत थांबला असून  त्याचे कमरेला पँटच्या आतील बाजूस 
एक गावठी पिस्टल लावलेले आहे.आशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन खात्री करून त्यांस ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव 1) रोहित उर्फ बापू अरुण निकम वय 31 वर्ष राहणार श्रीरामनगर बारामती जिल्हा पुणे.
असे असल्याचे सांगितले.
त्याचे कब्जामध्ये देशी बनावटीचे एक पिष्टल व त्यासोबत लागणारे एक जिवंत काडतुस मिळून आलेने त्याचे विरोधात बारामती शहर पोलीस स्टेशन येथे आर्म ॲक्ट कलम 3 (25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर आरोपीची  वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी बारामती शहर पोस्टे चे ताब्यात देण्यात आले आहे. सदर कामगिरी मा.अंकित गोयल पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण,मा.आनंद भोईटे अपर पोलीस अधीक्षक, पुणे ,मा. गणेश इंगळे उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे मा.पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर ,सपोनी कुलदीप संकपाळ ,सहा.फौज बाळासाहेब कारंडे,सहा.फौज रविराज कोकरे,पो. हवा अभिजीत एकशिंगे,पो.हवा.स्वप्निल अहीवळे,पो.नाईक निलेश शिंदे यांनी केली आहे

No comments:

Post a Comment