बारामती तालुक्यातील करंजे गावात महिलांनी केला मान्यवरांचा सन्मान.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 10, 2024

बारामती तालुक्यातील करंजे गावात महिलांनी केला मान्यवरांचा सन्मान..

बारामती तालुक्यातील करंजे गावात महिलांनी केला मान्यवरांचा सन्मान..
बारामती:-भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मंगलताई वाघ यांच्या दौऱ्यात गाव भेटीवर जास्त भर देत त्यांनी बारामती शहरासह बारामती तालुक्यातील गावा गावात भेट देऊन भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणं राबविण्यासाठी संपर्क दौरा काढण्यात आला होता यादरम्यान  बारामती तालुक्यातील करंजे गावातील ग्राम पंचायत सदस्य सह अनेक महिला बचत गटाच्या महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाची त्यांच्या देशभर व देशाबाहेर  होत असलेल्या कार्याचे कौतुक करून केंद्र शासन व राज्य सरकार राबवित असलेल्या शासकीय योजना घराघरात पोहचत असल्याने प्रभावित होऊन यावेळी अफसाना मुलाणी ग्राम पंचायत सदस्यांनी व त्यांच्या सोबत असलेल्या महिला बचत गटाच्या अनेक महिलांनी बारामती तालुक्यातील करंजे गावात आलेल्या पाहुण्यांचे 'अतिथी देव भव' कर्तव्य म्हणून महिला पदाधिकारी व सदस्यांचा सन्मान केला. अनेक महिलांनी यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलताई वाघ यांचे स्वागत केले यावेळी भाजप पुणे ग्रामीण उपाध्यक्ष महिला मोर्चा पिंकीताई मोरे,भाजप जिल्हा कार्यकारी सदस्य संतोष जाधव,भाजपच्या बारामती तालुका महिला अध्यक्ष वर्षा भोसले, विधानसभा संयोजक महिला मोर्चा पल्लवी वाईकर,भाजप उपाध्यक्ष सारिका लोंढे व महिला उपस्थित होते.यावेळी ग्राम सदस्य अफसना मुलाणी यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, आम्ही पक्ष प्रवेश केला नाही तर स्वागत केले.

No comments:

Post a Comment