माझा परिवार महाराष्ट्र राज्य महिला ग्रुपच्या माध्यमातून हळदीकुंकू व महिला मेळावा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, January 11, 2024

माझा परिवार महाराष्ट्र राज्य महिला ग्रुपच्या माध्यमातून हळदीकुंकू व महिला मेळावा..

माझा परिवार महाराष्ट्र राज्य महिला ग्रुपच्या माध्यमातून  हळदीकुंकू व महिला मेळावा..
बारामती:- माझा परिवार महाराष्ट्र राज्य महिला ग्रुप या ग्रुपच्या माध्यमातून बारामती तालुक्यातील महिलांसाठी हळदीकुंकू महिला मेळावा गेट-टुगेदर उपक्रम आयोजित करण्यात आला 9जानेवारी  या दिवसी बारामती या ठिकाणी या ग्रुपच्या माध्यमातून पदांच्या सुद्धा नियुक्ती करण्यात आल्या नियुक्तीपत्र सुद्धा वाटप करण्यात आले या ग्रुपचे बारामती तालुका अध्यक्ष अनिताताई  गायकवाड याच्या माध्यमातून  उपक्रमासाठी राष्ट्रवादी कार्यालय भिगवन चौक येथे  उपलब्ध करून देण्यात आले बारामती तालुका उपाध्यक्ष अल्पाताई भंडारी, बारामती तालुका कार्याध्यक्ष सोनाली यादव, महाराष्ट्र राज्य नियंत्रण कक्ष पूनम ताई भोंडवे, महाराष्ट्र राज्य मार्गदर्शन पदी पल्लवीताई चौगुले, महाराष्ट्र राज्य नियंत्रण कक्ष उषा भोसले, सविता गाडेकर, पुणे जिल्हा अध्यक्ष मंदाकिनी माने, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुप्रिया गायकवाड महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ज्योतीताई बोराटे, सावळ अध्यक्ष मीनाक्षी वीर, उपाध्यक्ष नीता जाधव, काटेवाडी अध्यक्ष प्रियंका अवघडे,कण्हेरी अध्यक्ष सोनिया बनसोडे इत्यादी नियुक्त्या करण्यात आले गुपमधे आले आहे या ग्रुपच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करणे महिलांसाठी विविध उपक्रमांच आयोजन करणे, महिलांना धाडसी बनवणं असा वसा घेण्यात आला आहे या ग्रुपच्या माध्यमातून  महिलांसाठी खुले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातून 1025 महिला एकत्रित आले आहेत, ग्रुपच्या माध्यमातून या ग्रुपचे ग्रुप चालक राहुल  जगन्नाथ भापकर रा. लोणी भापकर हे आहेत.

No comments:

Post a Comment