मेडद मध्ये का होतात वारंवार चोऱ्या, दुसऱ्यांदा फोडले दुकान.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 8, 2024

मेडद मध्ये का होतात वारंवार चोऱ्या, दुसऱ्यांदा फोडले दुकान..

मेडद मध्ये का होतात वारंवार चोऱ्या, दुसऱ्यांदा फोडले दुकान..
 
बारामती:-बारामती व आसपासच्या भागात चोरांचा सद्या धुडगूस घातला असून यावर तात्काळ कार्यवाही होणं गरजेचं असल्याने मागणी होत आहे, नुकताच बारामती शहरानजीक मेडद येथे काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी तीन दुकाने फोडली होती, त्या घटनेचा तपास
लागण्यापूर्वीच शनिवारी (दि. ६) पुन्हा त्याच दुकानात पुन्हा चोरी झाली आहे. माळेगाव पोलिस ठाण्याच्या कारभारावर यामुळे आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बारामती-मोरगाव रस्त्यानजीक हे तीन गाळे आहेत.काही दिवसांपूर्वी ही तिन्ही दुकाने फोडण्यात आली होती.त्या वेळी रोख रकमेसह तिन्ही दुकानांतील साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते. याप्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पंधरा दिवसांपूर्वी चोरट्यांनी गाळ्याच्या पाठीमागील बाजूचे पत्रे उचकटून आतमध्ये प्रवेश केला होता. शनिवारी मध्यरात्री मात्र पुढील बाजूचे शटर कशाने तरी वाकवून आतमध्ये प्रवेश
केला गेला. गेल्या वेळी एसपी आईस्क्रिम पार्लर अॅण्ड कोल्डिक्स, हुसनैन इंटरप्रायजेस व रॉयल स्नॅक्स या तिन्ही दुकानांतून साहित्यासह रोख रक्कम चोरीला गेली होती.या वेळी घटनेत एसपी आईस्क्रिम पार्लर अॅण्ड  कोल्डिक्स या दुकानातून चोरट्यांनी आईस्क्रिम बॉक्स व
किरकोळ रक्कम चोरीला गेली. पंधरा दिवसांत दोनदा तीच दुकाने फोडली गेल्याने पोलिसांच्या तपासातील हलगर्जीपणा दिसत आहे. यापूर्वीच्या चोरीचा तपास अद्याप लागला नसून, व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण
असल्याचे येथील व्यावसायिक माधव झगडे यांनी सांगितले.दरम्यान, याप्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

No comments:

Post a Comment