जिद्द चिकाटी आत्मविश्वासाच्या जोरावर यश शक्य :मेरी कोम
शरयू फाउंडेशन आयोजित बारामती हाफ मॅरेथॉन ला प्रचंड प्रतिसाद
बारामती: - कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष करत, जिद्द चिकाटी आत्मविश्वास या जोरावर आपण यश मिळवू शकतो व ते यश मी मिळवले असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध महिला बॉक्सर व ऑलम्पिक विजेत्या मेरी कोम यांनी केले.
बारामती येथे रविवार दि.११ फेब्रुवारी रोजी शरयू फाउंडेशन यांच्यावतीने बारामती हाफ मॅरेथॉन २०२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये मेरी कोम यांनी उपस्थित सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले.
पहाटे सहा वाजता शरयू फाउंडेशनचे अध्यक्षा शर्मिला पवार,उद्योजक श्रीनिवास पवार,मेरी कोम यांच्या हस्ते झेंडा दाखवून उदघाटन करण्यात बक्षीस वितरण प्रसंगी प्रांताधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव उपयोगी पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक केसरकर, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, गोरख गायकवाड व बारामती रनर्स चे डॉ वरद देवकाते, अमोल वाबळे , ऍड रोहित काटे व इतर मान्यवर उपस्तीत होते.
खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः
३ किमी धावणे मध्ये रीतसर नोंदणी करून सहभाग घेतला व उपस्तीत खेळाडूंना प्रोत्साहित केले.
४ अपत्ये असताना सुद्धा सराव कधीही चुकला नाही सांसारिक जवाबदारी पार पाडताना पतीचे सहकार्य मिळाले ऑलम्पिक मध्ये सुवर्णपदक मिळवायचे होते परंतु ब्रांच पदकावर समाधान मानावे लागले ही सुद्धा खंत आहे. यश मिळवायचे असेल तर सराव शिवाय पर्याय नाही ध्येय निश्चित करा, ध्येयापर्यंत पोहोचेपर्यंत इतर प्रलोभन, आमिषाला बळी पडू नका असा सल्ला मेरी कोम यांनी दिला.
ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ व मैदान प्राप्त करून देणे त्याचप्रमाणे आरोग्याचा जनजागर होण्यासाठी सदर मॅरेथॉनच्या माध्यमातून प्रत्यन करत असल्याचे फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी सांगितले.
शरयु फौंडेशनच्या च्या कार्याचा आढावा ऍड शुभम नींबाळकर यांनी घेतला.
विजेते खेळाडू व वेळ पुढील प्रमाणे
२१ किलोमीटर (परदेशी खेळाडू पुरुष) प्रथम, अडणीव टोलेसा: वेळ १ तास १२ मिनिटे,द्वितीय: एकेले निगुसे : वेळ १ तास १४ मिनिटे
तृतीय मगासे सोरा: १ तास २१ मिनिटे
२१ किलोमीटर.(परदेशी महिला खेळाडू ) प्रथम हिलंडा तनई १तास १९ मी.
द्वितीय: बिर्गिड किमतवाई १ तास २९ मी.
२१ की.मी. पुरुष (खुलागट)
प्रथम:अंकुश हालके ,१ तास ८ मी.
द्वितीय: मनीष राजपूत:१ तास ०९ मी
तृतीय: विशाल गंभीरे: १ तास १० मी.
२१ की. मी. स्त्री (खुला गट)
प्रथम: राणी मचनंदी,१ तास २१ मी
द्वितीय:आकांक्षा शेलार १ तास२२ मी.
तृतीय: वैष्णवी मोरे १ तास २५ मी.
१० किमी पुरुष प्रथम,सुनील कुमार ३१ मी. ५६ सेकंद, द्वितीय महादेव कोळेकर,३२मी ३३ से .तृतीय कृपाशंकर यादव ३२ मी ५२ से.
१० कि. मी.महिला
प्रथम प्राजक्ता शिंदे ३८मि ५९ से.
द्वितीय सुरेखा मदने ४० मी ५७ से.
तृतीय दीक्षा लोणार ५१ मी.०४ से.
जवळपास ६ हजार सहभागीनी स्पर्धा पूर्ण केली. प्रत्येक सहभागी खेळाडूंना पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
सहभागी खेळाडू,प्रशिक्षक, व सर्वांनी उत्कृष्ट अयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.खेळाडूच्या मुलाखती
श्री सावळेपाटील यांनी घेतल्या ,सूत्रसंचालन अनिल रुपणवर व आभार डॉ. पी. एन देवकाते यांनी मानले.
चौकट:
आफ्रिकन खेळाडू पेक्षा भारतीय खेळाडूंनी या वेळेस बाजी मारली तर हरियाणा मधील ६५ वर्षीय भजनलाल व त्यांचा मुलगा 32 वर्षीय हरभजन या पिता पुत्राच्या जोडीने स्पर्धा पूर्ण करत केलेले भांगडा नृत्य ने डोळ्यांचे पारणे फेडले तर नऊवारी साडी घालून महिलांनी भाग घेतला बालकां पासून ज्येष्ठा पर्यंत प्रत्येक स्त्री पुरुषाचा सहभाग आनंददायी व उल्हासपूर्ण होता.
मी पुन्हा येईन ....
मला बारामती आवडली बारामतीचे वातावरण, पर्यावरण, व स्पर्धेचे नियोजन आवडले मला परत बोलावले तर मी पुन्हा येईन असे वक्तव्य मेरी कोम यांनी केले व व उपस्थितांनी प्रचंड दाद दिली.
No comments:
Post a Comment