बेकायदेशीर..घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस काढून काळ्या बाजारात विक्री;गुन्हेशाखेकडून कारवाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 26, 2024

बेकायदेशीर..घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस काढून काळ्या बाजारात विक्री;गुन्हेशाखेकडून कारवाई..

बेकायदेशीर..घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस काढून काळ्या बाजारात विक्री;गुन्हेशाखेकडून कारवाई..
पुणे:- गॅस चा काळाबाजार चालू असल्याचे उघडकीस येत असताना मात्र आर्थिक घेवाण देवाण होत असल्याने याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगण्यात येत आहे,घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून लहान गॅस सिलेंडर
मध्ये पिनच्या सहाय्याने बेकायदेशिर रिफिलिंग करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने शनिवारी (दि.24)
सायंकाळी सातच्या सुमारास हिंजवडी फेज-2 येथील मोकळ्या जागेत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये केली. याबाबत पोलीस हवालदार उमेश मधुकर पुलगम यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सचिन बिरा मेटकरी
(वय-24 रा. बोकडेवाडी, हिंजवडी फेज 2 ) याच्यावर आयपीसी 285, 286 सह जिवनावश्यक वस्तुंचा कायदा 1955 चे कलम 3, 7 सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन1908 चे कलम 5 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरोडा विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी हिंजवडी परिसरात पेट्रोलिंग करत असताना फेज दोन येथे असलेल्या मोकळ्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस काढून काळ्या बाजारात विक्री केली
जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला.
त्यावेळी आरोपी घरगुती वापराच्या भरलेल्या गॅस सिलेंडर मधून पिनच्या सहाय्याने गॅस अवैधरित्या दुसऱ्या सिलेंडर मध्ये भरताना आढळून आला.
आरोपी बेकायदेशीररित्या कोणत्याही परवानगी शिवाय व 1908 चे कलम 5 नुसार गुन्हा दाखल केला आहे.दरोडा विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी हिंजवडी परिसरात पेट्रोलिंग करत असताना फेज दोन येथे असलेल्या मोकळ्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती वापराच्या
गॅस सिलिंडरमधून गॅस काढून काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला.
त्यावेळी आरोपी घरगुती वापराच्या भरलेल्या गॅस सिलेंडर मधून पिनच्या सहाय्याने गॅस अवैधरित्या दुसऱ्या सिलेंडर मध्ये भरताना आढळून आला.
आरोपी बेकायदेशीररित्या कोणत्याही परवानगी शिवाय व कोणत्याही सुरक्षितते शिवाय भरलेल्या सिलेंडर मधील गॅस रिकाम्या गॅस टाकीमध्ये भरत होता. यावेळी जिवीतास धोका होण्याची शक्यता असताना देखील आरोपी हा बेकायदेशीर कृत्य करत असताना आढळून आला. पुढील
तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.

No comments:

Post a Comment