समस्या बारामतीत टि.सी कॉलेज मागील चिंचकर इस्टेट चौक रोड ते तांदूळवाडी रोड ह्या 12 मीटर रोड च्या... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, April 6, 2024

समस्या बारामतीत टि.सी कॉलेज मागील चिंचकर इस्टेट चौक रोड ते तांदूळवाडी रोड ह्या 12 मीटर रोड च्या...

समस्या बारामतीत टि.सी कॉलेज मागील चिंचकर इस्टेट चौक रोड ते तांदूळवाडी रोड ह्या 12 मीटर रोड च्या...
बारामती:-बारामती शहरातील उपनगरात रस्त्याचे काम काही ठिकाणी चालू आहे तर काही ठिकाणी मुद्दामच ठेवले आहे, ऐन निवडणूक तोंडावर आल्यावर रस्ता होतो की काय अशी प्रतिक्रिया उमटले जात आहे, तर काही भागात रस्ता गरजेचा का होत नाही असा सवाल विचारला जात असून यापैकी  
1) चिंचकर इस्टेट चौक ते तांदूळवाडी रोड हा 12मीटर रोड या एरिया मधील एक महत्त्वाचा रोड आहे.हा रोड होऊन 10 वर्षे झालेली आहेत,या रोडची अवस्था खूपच बीकट झालेली आहे..
त्यातच आणखी भर म्हणजे मध्यंतरी जीवन विकास प्राधिकरण ची पाण्याची टाकलेली लाईन,यामुळे रस्ता अजूनच खराब व जागोजागी अरूंद झालेला आहे.जागोजागी रस्ता खोदलेला आहे,तसेच अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत.
हे आसलेले खड्डे तातडीने बुजवण्याची व "नविन 12मीटरचा रुंद रोड" करण्याची परिसरातील नागरिकांची आग्रही मागणी आहे.
2) तसेच तांदूळवाडी रोड वरून चिंचकर इस्टेट,प्रगती नगर कडे वळताना पुढे आले वर एका ठिकाणी धोकादायक वळण आहे,यामुळे 12मीटर रस्ता खुपच छोटा झालेला आहे.. या अरुंद रस्त्यावर काही मार्ग निघला तर उत्तम होईल.
3) तसेच श्री.बाळासाहेब गायकवाड यांचे घरापासून तांदूळवाडी रोड ला स्ट्रीट लाईटचे पोल बसवले आहेत मात्र लाईट बसवणेचे काम बाकी आहे.यामुळे रोड वर राञी खुपच अंधार असतो..मुली,महिलांना जाता येता या रस्ताने असुरक्षित वाटते तसेच काही अनुचित घटनाही या पॉईंट वर घडलेल्या आहेत व घडत आहेत.तरी तातडीने वरील समस्या सोडवून नागरिकांना सहकार्य करावे ही विनंती करण्यात आली आहे, जागोजागी खोदलेले रस्ते..व साईड पट्टया काही ठिकाणी  उपलब्धच नाहीत तर काही ठिकाणी पुर्ण खचलेल्या आहेत, 12मीटर रोड या ठिकाणी अरूंद व खराब आहे,खचलेल्या साईडपट्टया व खराब अरूंद रोड, तांदुळवाडी रोड वरून चिंचकर इस्टेट,प्रगती नगर कडे वळताना 12मीटर रोड पुर्ण फुटलेला आहे व  अरूंद झालेला आहे याची तात्काळ दखल घेण्यात यावी अशी स्थानिक रहिवाशी मागणी करीत आहे.

No comments:

Post a Comment