धक्कादायक...एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात अल्पवयीन मुलीवर कोयत्याने हल्ला.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 2, 2024

धक्कादायक...एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात अल्पवयीन मुलीवर कोयत्याने हल्ला.!

धक्कादायक...एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात अल्पवयीन मुलीवर कोयत्याने हल्ला.!
पुणे:-गुन्हेगारी वाढत चाललेली असल्याचे दिसत असून यामध्ये अल्पवयीन गुन्हेगार जास्त वाढत आहे,त्यातच कोयता हल्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे दिसत  आहे. तपुण्यात एका अल्पवयीन तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटिव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
पुण्यातील सदाशिव पेठेत झालेल्या घटनेची पुनरावृत्ती टळली आहे.अल्पवयीन मुलीवर तरुणाकडुन कोयत्याने हल्ला करण्यात आला, इयत्ता ११वी मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात अडवत कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने
परिसरात खळबळ उडाली आहे. मुलगी बोलत नसल्याच्या
रागातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नागरिकांनी आरडा-ओरडा केल्यानंतर दुचाकीवरून
आलेले दोन २ तरुणांनी पळ काढला. त्यामुळे मोठा अनर्थ
टळला. खडक पोलीस ठाण्यात महेश सिद्धप्पा भंडारी
आणि त्याच्यासोबत असलेल्या एकावर गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश आणि अल्पवयीन मुलगी
हे दोघे ही एकमेकांना ओळखतात. दरम्यान मुलगी व
तिच्या तीन मैत्रिणी दुपारी सुभाषनगर येथील गल्ली क्रमांक
६ येथून जात होत्या. यादरम्यान महेश व त्याचा मित्र येथे
आले. महेशकडे कोयता होता त्याने झालेल्या वादातून त्या
मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे असलेल्या नागरिकांनी हे पाहताच आरडा ओरड केली आणि या
तरुणांनी तिथून पळ काढला
अल्पवयीन मुलीकडून अद्याप पोलिसात तक्रार देण्यात
आलेली नसली तरी सुद्धा पोलिसांनी कारवाईला सुरुवात
केली असून गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment