बारामतीत रस्त्यावरच अचानक होर्डिंग्जचा बॅनर फाटून आल्याने वाहनचालक गडबडले... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 14, 2024

बारामतीत रस्त्यावरच अचानक होर्डिंग्जचा बॅनर फाटून आल्याने वाहनचालक गडबडले...

बारामतीत रस्त्यावरच अचानक
 होर्डिंग्जचा बॅनर फाटून आल्याने वाहनचालक गडबडले...
बारामती:-बारामतीत रस्त्याच्या कडेला भले मोठे होर्डिंग्ज लावले असून वारे व वादळ पावसामुळे ते फाटून रस्त्यावर येत असल्याचे दिसत आहे,नुकताच बारामती रेल्वे उड्डाण पूल रस्त्यावर भला मोठा बॅनर फाटून रस्त्यावर आला

यादरम्यान वाहनचालक अचानक आलेल्या या बॅनर मुळे गडबडून गेले कारण नुकताच मुंबई मध्ये धोकादायक होर्डिंग्ज मुळे अनेकांना जीव गमवावा लागला असल्याचे पाहत आहोत,बारामतीत नगरपालिकेने सर्व होर्डिंगधारकांना आतापर्यंत दोन वेळा नोटीस दिल्या असल्याचेही सांगण्यात आले,बारामतीतही लावलेली बहुसंख्य होर्डिग्ज बेकायदा लावलेली असून वादळात या होर्डिंग्जमुळेही दुर्घटना घडू शकते.एकट्या बारामती शहरात जवळपास 70 होर्डिंग्ज असून एकाही होर्डिंगला रितसर परवानगी घेतली नसल्याची माहिती मिळतेय.या बाबत बारामती नगरपालिकेने सर्व होर्डिंगधारकांना आतापर्यंत दोन वेळा
नोटीस दिल्या असल्याचे कळतेय.खाजगी मालमत्तेच्या ठिकाणी होर्डिंग्ज लावलेले
असले तरी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची
परवानगी आवश्यक असते, बहुसंख्य
होर्डिंग्जबाबत परवानगीच घेतलेली नसल्याचे समजत आहे. प्रत्यक्षात मात्र नगरपालिकेने
कोणालाही परवानगीच दिली नसल्याची बाब
आता पुढे आली आहे. बारामतीहून बाहेर
जाणा-या मोरगाव, फलटण, नीरा, इंदापूर, पाटस,
भिगवण रोड,रेल्वे उड्डाण पूल अशा सर्वच रस्त्यांवर मोठ्या संख्येने अनेक होर्डिंग्ज महामार्गालगत असून वादळामुळे
दुर्घटना घडल्यास रस्त्यावरुन जाणा-या
वाहनचालकांच्या जीवावर बेतू शकते इतक्या
मोठ्या आकाराची होर्डिंग्ज अनेक ठिकाणी
लावण्यात आली आहेत.याबाबत काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रतिक्रिया उमटत आहे.

No comments:

Post a Comment