बारामती नगर परिषदेचे नाव बदलून एका राजकीय पक्षाचे नाव देण्याची मागणी.! बा.न.प.चा भोंगळ कारभार..(भाग 5) - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, July 29, 2024

बारामती नगर परिषदेचे नाव बदलून एका राजकीय पक्षाचे नाव देण्याची मागणी.! बा.न.प.चा भोंगळ कारभार..(भाग 5)

बारामती नगर परिषदेचे नाव बदलून एका राजकीय पक्षाचे नाव देण्याची मागणी.! बा.न.प.चा भोंगळ कारभार..(भाग 5)
बारामती:- बारामती नगर परिषद महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध आहे, येथील होत असलेला विकास तसेच नव्याने झालेली राजकीय लढाई चांगलीच प्रसिद्ध झाली व होत आहे,राजकीय वातावरण तापत असताना मात्र सर्व सामान्य नागरिकांचे कामे होताना दिसत नाही,मेटाकुटीला आलेला नागरिक संतप्त प्रतिक्रिया देताना आवर्जून म्हणतो की बारामती नगर परिषद मधील अधिकारी फक्त एका राजकीय पक्षाचे अधिकारी आहेत की जनतेच्या कामासाठी नेमलेले अधिकारी आहेत हे कळत नाही, कारण या अधिकाऱ्यांना राजकीय पक्षाच्या नेत्यांना वेळ देता येतो त्यांची कामे करता येतात मात्र सर्व सामान्य नागरिकांना वेळ नाही उलट तारीख पे तारीख दिली जाते यामुळं नक्की अधिकारी कुणाचं काम करतात हे समजण्या पलीकडे कोणी दुध खूळ राहिलं नाही, विभागीय अधिकारी तर टोलवा टोलवी करून सर्व दुसऱ्यावर ढकलून मोकळा होतो आणि नागरिकांची हेळसांड करितो हे पाहावयास मिळत आहे. तर सायंकाळच्या दरम्यान मात्र ठेकेदार, बिल्डर, इंजिनिअर,राजकिय पुढारी, माजी नगरसेवक यांना मात्र वेळ देण्यास कधीही तयारी असते या मागे काय गौडबंगाल आहे हे दिसत असले तरी गप्प बसण्याशिवाय पर्याय नाही अशी वस्तूस्थिती झाली असून सर्वसामान्य नागरीकांची कामे कधी होणार?अनेक मूलभूत सुविधा अपुऱ्या असून याबाबत वेळोवेळी अर्ज करूनही त्याकडे कानाडोळा केला जातो मात्र बड्या लोकांची कामे तात्काळ मार्गी लागतात हे चित्र सद्या पहावयास मिळत आहे.

No comments:

Post a Comment