ब्रह्म मूर्ती संत श्रीपाद बाबा महाराज. ब्रह्म मूर्ती संत रामदास महाराज पालखी सोहळाचे अंजनगाव येथे स्वागत.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 10, 2024

ब्रह्म मूर्ती संत श्रीपाद बाबा महाराज. ब्रह्म मूर्ती संत रामदास महाराज पालखी सोहळाचे अंजनगाव येथे स्वागत..

ब्रह्म मूर्ती संत श्रीपाद बाबा महाराज. ब्रह्म मूर्ती संत रामदास महाराज पालखी सोहळाचे अंजनगाव येथे स्वागत..
बारामती:- ब्रह्म मूर्ती संत श्रीपाद बाबा महाराज. ब्रह्म मूर्ती संत रामदास महाराज पालखी सोहळा आनंदगड शिरूर ते पंढरपूर पायी वारी
अंजनगाव येथे आगमनाच्या वेळी  युवा उद्योजक इंद्रजीत पाटील वायसे व सर्व ग्रामस्थांनी भक्तिमय वातावरणामध्ये पालखीचे फटाक्याची आतिषबाजी व रांगोळी व फुले टाकून स्वागत करण्यात तसेच संध्याकाळचे कीर्तन राजाराम बाबा जगताप महाराज यांचे झाले. भोजन व्यवस्था हनुमंत मामा वायसे तसेच किरण परकाळे.चहा व नाश्ता स्वर्गीय बापूराव कृष्णा कुचेकर यांच्या स्मरणात .प्रशांत दादा या दोन्ही भावांनी केली .यावेळी माजी सरपंच दिलीप दादा परकाळे. सोमेश्वर कारखाना माजी डायरेक्टर बाळासाहेब परकाळे. कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक दादासाहेब मोरे. विष्णुपंत सस्ते .जालिंदर वायसे . पायी जाणाऱ्या दिंडीतील सर्व वारकरी महिला बंधू भगिनींना शुभेच्छा दिल्या .तसेच स्वप्निल महाराज दौंडकर.प्रताप महाराज चव्हाण . हनुमंत महाराज कवितके. दिंडी चालक विद्याताई जगताप . गुरुदास महाराज जगताप.यांचे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार व आभार मानण्यात आले.

No comments:

Post a Comment