बारामतीत सावकारी घेतेय भरारी.! अनेक जण अडकलेत त्याच्या आहारी..!! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, August 3, 2024

बारामतीत सावकारी घेतेय भरारी.! अनेक जण अडकलेत त्याच्या आहारी..!!

बारामतीत सावकारी घेतेय भरारी.! 
अनेक जण अडकलेत त्याच्या आहारी..!!
बारामती :-बारामतीत सावकारी वाढत चालली असल्याचे अनेक घटना समोर येत आहेत कुणी जमिनी बळकवतोय तर कुणी घर बळकवतोय तर कुठे घरातील महिलांना त्रास देतंय, तर कुठे व्याजाच्या पैशासाठी मारहाण करतोय असे अनेक प्रकार समोर येत आहे, कुणी तक्रार करतो तर कुणी भितीपोटी पुढे येत नाही, मात्र सावकारी पायी आपलं आयुष्य संपविल्याच्या घटना देखील पुढे आल्या आहेत, या सावकारी करणाऱ्याला आळा बसेल काय?सावकारांनी गुंड प्रवृत्ती ची लोक सांभाळली असल्याने वसुली करताना किती दंडेलशाही होते याची मालिका लवकरच प्रकाशित करणार आहोत.सावकारी च्या अनेक तक्रारी येत असतात त्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात,नुकताच कोरोना काळात हॉस्पिटलच्या
उपचारासाठी घेतलेल्या १ लाख ६५ हजार रुपयांच्या बदल्यात ५ लाख ९४ हजार रुपये दिल्यानंतरही आणखी पैशांची मागणी करत शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी तिघांविरोधात बारामती शहर पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी
अधिनियमासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.द्वारका कैलास कारंडे, प्रशांत
कैलास कारंडे (रा. श्रीरामनगर,बारामती) व दिपाली नाझीरकर (रा. रुई, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सारिका सदाशिव मांडगे (रा.श्रीरामनगर) यांनी फिर्याद दिली आहे.सप्टेंबर २०२२ ते २२ जुलै २०२४ या कालावधीत ही घटना घडली.
फिर्यादीला २०२२ मध्ये कोविड झाल्याने एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यामुळे द्वारका कारंडे यांच्याकडून फिर्यादीच्या पतीने १ लाख ६५ हजार रुपये पाच टक्के
व्याजाने घेतले होते. कारंडे यांनी तसे
स्टॅम्पपेपरवर लिहून घेत फिर्यादीचा
मुलगा आशिष यांच्याकडून पाच कोरे धनादेश घेतले होते.फिर्यादी या रकमेपोटी दरमहा
८२५० रुपये व्याज रोखीने देत होत्या. व्याजाची रक्कम देण्यास उशीर झाल्यास त्याला चक्रवाढ व्याज लावले जात होते.व्याज देण्यास उशीर झाल्यास कारंडे यांच्याकडून घरी येऊन शिवीगाळ,दमदाटी केली जात होती. त्यांची मैत्रीण नाझीरकर या पैसे घेण्यासाठी येत होत्या.
पैसे देण्यास उशीर झाल्यास महिला आणून तुला मारहाण करीन अशी धमकी नाझीरकर यांनी दिली. तसेच कारंडे यांनी पैसे न दिल्यास तुझ्या पतीवर व मुलावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करेन,धनादेश बाऊन्सची केस करण्याची
धमकी देत व्याजाच्या पैशांवरून शिवीगाळ दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
*सराफ असणाऱ्या सावकाऱ्याने व्याजापोटी करतोय जमीन बळकवण्याचा प्रयत्न?*  वाचा लवकरच

No comments:

Post a Comment