शिक्षकास अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी २० वर्षाची शिक्षा..
बारामती:- दिनांक ३०/०९/२०२४ रोजी बारामती येथील मे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश मा. अ. अ. शहापुरे साहेब यांनी आरोपी अमोल कृष्णा पांढरे वय वर्षे २७, रा. भिगवण ता. इंदापुर, जि. पुणे, मूळ रा. सोगांव पूर्व, ता. करमाळा, जि.
सोलापूर यांस अल्पवयीन मुलगी (वय - १४ वर्षे ) हीस लग्नाचे आमीष दाखवून तिला पळवून नेवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास भोगण्याची शिक्षा केली आहे.
थोडक्यात हकीकत अशी की, आरोपी हा २०१८ साली भिगवण येथे कराटे शिकण्याचे वर्ग घेत होता. त्याचेकडे पिडीता ही २०१७ सालापासून कराटे शिकण्यासाठी जात होती. आरोपीने तिच्याशी ओळख वाढवून तिस लग्नाचे आमीष
दाखवून तिस दिनांक ०१/०८/२०१८ रोजी पळवून नेले व तिचेवर त्याने मौजे वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर येथे तसेच पुणे येथे वारंवार लैंगिक संबंध केले.दिनांक १०/०९/२०१८ रोजी आरोपी यांस पिडीत मुलीसह ताब्यात घेवून आरोपीस पोलीसांनी अटक केली. पिडीत मुलीच्या वडिलांनी पिडीत मुलीस पळवून नेल्याबाबत भिगवण पोलीस स्टेशन येथे दिनांक ०१/०८/२०१८ रोजी फिर्याद दिली होती.
सदरील गुन्हयाचा तपास श्री. बी.एन. पवार पोलीस उपनिरीक्षक भिगवण पोलीस स्टेशन यांनी करुन आरोपी विरुध्द पिडीत मुलीस अपहरण करुन बलात्कार केल्याबाबत दोषारोप पत्र मे. कोर्टात दाखल केले होते.सदरील फौजदारी खटल्याचे कामकाज शासनातर्फे श्री. संदिप ओहोळ विशेष सरकारी वकील यांनी चालविले. त्यांनी या प्रकरणांत एकूण ११ साक्षीदार तपासले.यामध्ये पिडीत मुलीची, वैदयकीय अधिकारी तसेच पिडीतेचा जन्माचा दाखला देणारे अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. या प्रकरणांत आरोपीतर्फे पिडीता ही स्वइच्छेने आरोपी सोबत आल्याचा बचाव घेण्यात आला होता. परंतू कायदयाने अल्पवयीन
मुलीची / बालकाची संमती ग्राहय धरता येत नाही आणि प्रस्तूतच्या प्रकरणात पिडीतेची संमती नव्हती. तसेच आरोपी विरुध्द सबळ पुरावा असून आरोपीने गुन्हा केल्याचे सिध्द झाले आहे. आरोपी हा विवाहीत असूनही त्याने हा गुन्हा केला आहे व आरोपीने शिक्षक आणि विदयार्थी हे पवित्र नाते कलंकीत केले आहे.दोषी धरुन कठोर शिक्षा करण्यात यावी. असा युक्तीवाद सरकारी वकील श्री. संदिप ओहोळ यांनी केला होता. तो मान्य करुन मे. न्यायालयाने आरोपीने १६ वर्षाखालील त्यास अल्पयीन मुलीवर बलात्कार केला म्हणून आरोपीस भा.द.वि.कलम ३७६(३) अन्वये २० वर्षे सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंड, तसेच आरोपीने पिडीत अल्पवयीन
मुलीचे अपहरण केले म्हणून भा.द.वि. कलम ३६३ अन्वये ७ वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, तसेच आरोपीने पिडीत अल्पवयीन मुलीस विवाह, इ. ची सक्ती करण्यासाठी अपहरण केले म्हणून भा.द.वि. कलम ३६६ अन्वये ७ वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड तसेच आरोपीने शिक्षक असून वारंवार अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला म्हणून भा.द.वि. कलम ३७६ (२) (फ) (ज)(न) अन्वये १० वर्षे सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंड, तसेच आरोपीने अल्पवयीन मुलीशी लैंगिक
संबंध केले म्हणून पोक्सो अॅक्ट कलम ४ अन्वये ७ वर्षे सश्रम कारावास व १ हजार तसेच
रुपये दंड, तसेच आरोपीने अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक संबंध केले म्हणून पोक्सो अॅक्ट कलम ६ अन्वये १० वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड,आरोपीने १६ वर्षाखालील अल्पवयीन मुलीवर लैंगिक हल्ला केला म्हणून पोक्सो ५ वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, तसेच अॅक्ट कलम १० अन्वये आरोपीने अल्पवयीन मुलीस लैंगिक त्रास दिला म्हणून पोक्सो अॅक्ट कलम १२ अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.आरोपीने वरील शिक्षा एकत्रित पणे भोगण्याचा आदेश केला व दंडाची रक्कम पिडीत
मुलीस देण्याचा व सदरची रक्कम तुटपुंजी असल्याने सचिव, जिल्हा विधी सेवा समिती पुणे यांनी पिडीतेस कायदयान्वये नुकसान भरपाई रक्क्म देणेची शिफारस केली,सरकारी वकील यांना केस कामी अॅड. स्वप्नील जगताप, श्री. निश्चल शितोळे पोलीस उपनिरीक्षक, कोर्ट पैरवी अधिकारी श्री. नामदेव नलवडे पोलीस उपनिरीक्षक,विजय झारगड पोलीस हवालदार समन्स अंमलदार यांचे सहकार्य केले.
No comments:
Post a Comment