चंद्र सूर्य असेपर्यंत...मात्र राजकीय पक्षात हे चंद्र सूर्य असेपर्यंत नेत्याची लागतेय का वाट...?चर्चेला उधाण.

बारामती(संतोष जाधव):-राज्यात विधानसभा निवडणूक होती मात्र यामध्ये खऱ्या अर्थाने राजकीय चर्चा रंगताना जास्त प्रमाणात प्रामुख्याने बारामतीत "मलिदा गॅंग" याचाच जास्त प्रचार झालाय व होतोय, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत असताना काही भावनिक मुद्दे देखील पुढे येऊ लागली आहे.याच दरम्यान काही राजकीय पक्षात जसे आपण म्हणतो जोपर्यंत चंद्र सूर्य असेपर्यंत एखादा दिलेला विषय शब्द मोडणार नाही तसाच काहीस अशीच म्हणीप्रमाणे राजकीय पक्षात काम करणारी चंद्र सूर्य असेपर्यंत पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्याला महत्व प्राप्त होणार नाही अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते बोलताना करतात.तशी प्रतिक्रिया त्यांनी नेत्याच्या पुढे करूनही त्यातच कोणताच फरक पडला नसल्याचे दिसून येत आहे. आत्ता तर असे चंद्र सूर्य हे जे पुन्हा सक्रिय होऊन "मलिदा" लाटण्याचे काम करणार आहेत हे दिसून येईल शांत व संयमी भूमिका बजाविण्याचे काम करून 'आयत्या बिळावर नागोबा' होऊ पाहत असल्याचे चर्चेतून व्यक्त होताना दिसत आहे. नेते मंडळी मात्र अश्या लोकांना डोक्यावर घेतात आणि प्रामाणिक पणे काम करणारे वाऱ्यावर सोडतात यामुळेच लोकसभेला चित्र वेगळं दिसलं तर आत्ता ही वेगळं दिसल्याशिवाय राहणार नाही की जोपर्यंत तथागतीत चंद्र सूर्य पक्षात आहेत तोपर्यंत पक्षाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही अश्या प्रतिक्रिया उमटत असून नेते मंडळी याची दखल केव्हा घेणार हे म्हणी प्रमाणे चंद्र सूर्य असे पर्यंत..हे खरंच आहे.की म्हणी प्रमाणे वाटच पाहत राहायचे अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे.
No comments:
Post a Comment