मयुरेश्वर नगर मधील रहिवाश्यांना लाईट व रस्त्याची अजून किती दिवस पहावी लागेल वाट.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 1, 2025

मयुरेश्वर नगर मधील रहिवाश्यांना लाईट व रस्त्याची अजून किती दिवस पहावी लागेल वाट..

मयुरेश्वर नगर मधील रहिवाश्यांना लाईट व रस्त्याची अजून किती दिवस पहावी लागेल वाट..
बारामती:- बारामती विकासाच्या दिशेने जात असताना मात्र मयुरेश्वर नगर,कृष्णाई लॉन्स मोहिते वस्ती शेजारी असणाऱ्या लोकवस्ती कडे जाण्यासाठी व येण्यासाठी कच्चा रस्ता असून पक्का रस्ता कधी होणार रस्त्याच्या

कडेला दिवे(लाईट)कधी बसणार याकडे गेले अनेक वर्षे येथील रहिवासी वाट पाहत आहेत, याबाबत अनेक वेळा अर्ज दिले फक्त घरपट्टी घेतली जाते पण सुविधा मात्र दिल्या जात नसल्याचे येथील रहिवासी सांगत आहेत तरी लवकरात लवकर या कडे प्रशासनाने पाहावे व या भागात रात्रीच्या वेळेस पूर्ण अंधार असल्याने महिलांना अडविले जाते, चोऱ्या होण्याचे प्रकार घडत असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment