शिवशाही बसच्या काळ्या काचेवर कारवाई होणार का?पुढील अनर्थ टळेल का.
बारामती:-नुकताच स्वारगेट बस स्थानक येथे शिवशाही बसमध्ये घडलेल्या बलात्कार प्रकरणी वातावरण तापले असताना दुसरीकडे अश्या शिवशाही बस व इतर बसला काळ्या काचावर कारवाई होईल का?अशी जनतेतून मागणी होत असून या काळ्या काचामुळे आत मध्ये काय घडतंय हे दिसू शकत नाही आणि काही वेगळं घडू नये याची खबरदारी घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे, अश्या प्रकारे काचांवर काळी फिल्म लावून राज्यात धावणाऱ्या वाहनचालकांना तत्काळ रोखा. चालकांवर कारवाई करा आणि वाहनांवरील काळी फिल्म काढून टाका,असे आदेश असताना, तसं होताना दिसत नाही,
त्यामुळे फिल्म लावून धावणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली असली तरी अनेक ठिकाणी अश्या गाड्या पहावयास मिळत आहे,केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार, सुरक्षेच्या
कारणावरून महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावण्यास परवानगी आहे. झेड आणि झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांच्या काचांवरही काळी फिल्म लावण्याची मुभा आहे. मात्र, अनेक जण आपल्या वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावून धावतात. गैरप्रकारात गुंतलेली मंडळी या काळ्या फिल्मच्या आड काय करतात, ते वारंवार उजेडात आल्यामुळे अभिषेक गोयंका यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका(क्र. २६५/२०११) दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने वाहनांच्या काचांवर लावलेल्या काळ्या फिल्म तत्काळ काढून टाकण्याचे
आदेश दिले होते.या आदेशाची काही दिवस पोलिसांनी अंमलबजावणी केली. आता मात्र जिकडे तिकडे काचांवर काळी फिल्म लावून धावणारी वाहने सर्वत्र आढळतात. अशा
वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.शहरातील वाहन चालकांनी या नियमाचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, आदेशाचे उल्लंघन झाल्यास सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या आदेशाची अवमानना केल्याचे समजण्यात येईल असं कळतंय. वाहनांना काळ्या काचा लावल्यामुळे आत कोण बसले आहे,ते काय करत आहेत, हे समोर येत नाही. त्याचा गैरफायदा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती घेत असल्याचे पोलिस तपासात समोर आले. खून, बलात्कार, दरोडा याबरोबर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्यांनीदेखील काळ्या काचांचा
आडोसा घेतल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने देशातील अशा सर्व फिल्मिंग तातडीने उतरविण्याचा व त्या बसविण्याला प्रतिबंध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पोलिस महासंचालकांनीही सर्व पोलिस
आयुक्त व अधीक्षकांना काळ्या काचांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी ब्लॅक फिल्मिंगची कारवाई आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment