सुनील आण्णा पाटोळे एक सामाजिक कार्याने झपाटलेला अवलिया..
निरा:- येथील समाज सेवक व सोमेश्वर सहकारी साखर कारखाना संचलित हायस्कूलचे चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी तसेच भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष आमचे मित्र स्नेही सुनील आण्णा पाटोळे यांचा आज वाढदिवस यांच्या विषयी किती जरी लिहिलं तरीच कमी पडावे कारण प्रसंग असा आहे मी सुनील पाटोळे साहेबांना घेऊन दिल्ली येथे गेलो होतो त्यांना एका संस्थेचा पुरस्कार तिथे मिळाला होता त्या संस्थेच्या प्रमुखांनी मला स्टेज वरती बसण्यासाठी मज्जाव केला परंतु त्या वेळेला सुनील पाटोळे यांना ते दिल्लीकरांचे माझ्या बाबतीत चे वर्तन आवडले नाही तक्षणीस त्यांनी संबंधित जे पुरस्कार आयोजक आहेत त्यांना प्रचंड धारेवर धरलं आणि नंतर शब्दातूनच त्यांचा अपमान केला आणि नंतर माझं भाषण त्या कार्यक्रमात एवढं सुंदर झालं ते पाहून ते मला त्या क्षणीच म्हणाले की सर माझा राग आता शांत झाला तुम्ही विद्वत्तेने कष्ट जिंकलं आणि आयोजकाला विद्वत्तेनच नामोहरम केलं त्यामुळे आयोजकाला मारायचा प्रश्नच उपस्थित राहत नाही याच त्यांच्या शब्दावरून माझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये असणार प्रेम जिव्हाळा मला तक्षणी पटला असे सुनील पाटोळे सामाजिक कार्यान शाहू फुले आंबेडकरी चळवळीने गोरगरीब वंचित पिढीत उपेक्षित लोकांच्या करिता सतत जवळ पैसे जरी नसले तरी उसन वारे घेऊन लोकांना सतत मदतीसाठी धावणारे निरा गावामध्ये एखादा जवळचा कोण मृत झालेला असेल त्याच्यासाठी स्वतःच्या कष्टातून कमावलेले पैसे खर्च करून त्याला अगदी मयत तिचे सामान घेऊन देण्यापर्यंत मदत करणारे निरा पुरंदर गावामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असो पुण्यतिथी असो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती असो पुण्यतिथी असो महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करून थोर समाज सुधारक यांचे आदर्श लोकांच्या पर्यंत पोहोचवणारा रस्त्यावरील नगरपालिकेचे अथवा ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचाऱ्यांना स्वतःच्या पदरच्या पैशातून चहा पाजणारा प्रसंगी क्रेडिट वरती चहापासून त्यांची सहानुभूती मिळवणारा गोरगरीब लोकांच्या करता सतत धावत जाणारा अशी ओळख असणारे सुनील पाटोळे मला त्यांच्यामध्ये माणसांमध्ये देव दिसतो सुनील पाटोळे यांच्या विषयी किती लिहिलं तरी कमीच पडावे मी आयुष्यात अनेक माणसे पाहिले परंतु सतत हसतमुख व्यक्तिमत्व कधी चतुर्दश्रेणीचा चतुर्थ श्रेणी चा कर्मचारी सफाई कामगार म्हणून काम करत असले तरी शाळेमध्ये सर्व शिक्षकांच्या बद्दल सातत्याने सगळ्यांच्या मदतीसाठी धावून जाणारे सगळ्यांना चहा नाश्ता आणून देणारे विविध सामाजिक शैक्षणिक कार्यामध्ये अग्रक्रमाने पुढे पुढाकार घेऊन कार्य करणारे असे हे सुनील आण्णा पाटोळे निरांमधील अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी काम जर वर्षी करत असताना मला सातत्याने दिसून येत आहेत यांचे वैशिष्ट्य असं की सतत हसत बोलणार माझ्या कामाचं कौतुक करणार एवढं मोठं काम साठे सर राष्ट्रीय स्तरावरचे राष्ट्रीय पुरस्कार देतात ही काही साधी गोष्ट नव्हे असं म्हणून माझ्या कामावरती शाब्बास शाब्बासकीची थापड देणारे सुनील पाटोळे यांच्यामध्ये मला देव दिसतो आणि म्हणून आज त्यांचा 54 वा वाढदिवस त्यांना 54 वाढदिवसाच्या निमित्ताने मी भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघाचा राष्ट्रीय संघटक तसेच फुले शाहू आंबेडकर यांचा वसा व वारसा जपणारा छोटा कार्यकर्ता म्हणून मी त्यांना माझ्या कुटुंबाच्या वतीने मनःपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रदान करतो आपले उर्वरित आयुष्य सुखाचे समृद्धीचे प्रगतीचे भरभराटीचे यशोदायी फलदायी लाभदायी जावो आपल्या हातून समाजातील गोरगरीब वंचित बहुजन घटकाची सेवा घडो हीच भगवान तथागता चरणी आपल्याला परमेश्वराने उदंड आयुष्य देवो हीच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कळावे आपला हितचिंतक प्राध्यापक गोरख साठे बारामती
No comments:
Post a Comment