महाशिवरात्रीनिमित्त बारामती येथील वीर सावरकर जलतरण तलावामध्ये कुंभमेळा संपन्न..

बारामती:- प्रयागराज येथून रोहित दिलीप शिंदे यांनी गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमाचे पाणी बारामती येथे आणले होते .महाशिवरात्रीचे औचित्य साधून हे पाणी बारामती येथील वीर सावरकर जलतरण तलावामध्ये सोडण्यात आले, यावेळी दररोज पहाटे साडेपाच वाजता पहिली बॅच पोहण्यासाठी येते. त्यामध्ये वीर सावरकर जलतरण तलावाचे सर्व आजीव सभासद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बारामती जिल्ह्याचे संघचालक दिलीप शिंदे , रयत सेवक बँकेचे माजी चेअरमन देविदास गुरव, मेजर प्रा. मानसिंग गोडसे, माजी कृषि अधिकारी पी.एस.जगताप व कैलास गावडे ,मिलिंद तावरे, विलास ताटे यांनी आज पहाटे साडेपाच वाजता वीर सावरकर जलतरण तलावामध्ये प्रयागराज येथून आणलेले तीन नद्यांच्या संगमाचे पाणी विधीवत पूजा करून जलतरण तलावामध्ये सोडण्यात आले प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी जाता आले नाही म्हणून या सर्वांनी वीर सावरकर जलतरण तलावामध्ये कुंभमेळा उत्सव साजरा केला अशी माहिती वीर सावरकर जलतरण तलावाचे दत्ता तेलंगे यांनी दिली.
*** फोटोमध्ये डावीकडून: प्रा.मानसिंग गोडसे, देविदास गुरव, विलास ताटे,मिलिंद तावरे, पी एस जगताप,दिलीप शिंदे, कैलास गावडे.**
No comments:
Post a Comment