बारामतीत आणखी एकाचा गेला जीव, सिमेंट कॉक्रीटीकरणमुळे जीव वाचविण्यास होतेय अडचण? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 20, 2025

बारामतीत आणखी एकाचा गेला जीव, सिमेंट कॉक्रीटीकरणमुळे जीव वाचविण्यास होतेय अडचण?

बारामतीत आणखी एकाचा गेला जीव, सिमेंट कॉक्रीटीकरणमुळे जीव वाचविण्यास होतेय अडचण?
बारामती:- दि. १८/०२/२०२५ रोजी पोलीस स्टेशन बारामती शहर येथे चर्चेस ऑफ क्राईस्ट बॉईज होम बारामती येथील बालगृह अधीक्षक रॉबर्ट वसंत गायकवाड यांनी खबर दिली की, त्यांचे बालगृहांमध्ये सन 2018 पासून दाखल असणारा मुलगा नामे राजवीर वीरधवल शिंदे , वय 15 वर्षे हा व त्याचे दोन मित्र अर्जुन वाघारी व मोईन अमीर शेख असे मिळून बालगृहा मधून कोणाला काही न सांगता सांय. 4.30 वा. नटराज पार्क येथे फिरायला गेली त्यानंतर ते कॅनॉलमध्ये आंघोळ करण्यासाठी उतरले असता यातील मुलगा नामे राजवीर वीरधवल शिंदे यास पोहता येत नसल्याने तो पाण्यामध्ये बुडून वाहून गेला आहे.
    दिनांक 18 फेब्रवारी पासून सदर मुलाचा कॅनॉलमध्ये शोध घेतला असता आज रोजी त्याचे प्रेत बांदलवाडी या ठिकाणी कॅनॉलचे पाण्यात मिळून आले आहे. बालगृह अधीक्षक रॉबर्ट वसंतराव गायकवाड यांचे खबरी जबाबावरून अकस्मात मयत दाखल करून अधिक चौकशी करीत आहे.बारामतीत कॅनॉल ला केलेल्या सिमेंट कॉक्रीटीकरण मुळे व त्याला पायऱ्या नसल्यामुळे एखाद्याचा जीव वाचवताना किती त्रास होतो हे अनेकांनी बोलून दाखविले, कित्येक जणांचा बळी गेला आत्ता तरी पायऱ्या बनविणे, सुरक्षा कडडे बांधावे, लोखंडी ब्राकेट बसवावे अशी मागणी होताना दिसत आहे.तसेच तीनहत्ती चौक नजीक बागेकडे जाणाऱ्या लहान मुलं, महिला, जेष्ठ नागरिक यांना कॅनॉल च्या कडेला सुरक्षा कडडे नसल्याने भीतीदायक झाले आहे.

No comments:

Post a Comment